सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:42 AM2021-06-03T06:42:45+5:302021-06-03T06:43:48+5:30

विदेशी विद्यापीठांत कोणत्या आधारावर मिळणार प्रवेश?

cancellation of CBSE exams has worried the smart students | सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता

सीबीएसई परीक्षा रद्द झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना लागली चिंता

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : सरकारने सीबीएसई परीक्षा रद्द केल्यानंतर हुशार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा उमटली आहे, तर मोठ्या संख्येत विद्यार्थी असे आहेत की, सरकारच्या निर्णयामुळे ते आनंदात आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठांतील प्राध्यापक आणि प्राचार्य सरकारच्या निर्णयामुळे आनंदात आहेत. त्यांचे म्हणणे होते की, कोरोना महामारीत परीक्षा घेतली असती तर मुलांच्या जीविताशी खेळले गेले असते.

देशातील सगळी विद्यापीठे बारावीच्या नंतर प्रवेश कसा दिला जाईल, अशा प्रक्रियेवर विचार करीत आहेत. दिल्ली विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू व्ही. सी. जोशी यांचे म्हणणे असे की, “आम्ही अनेक पर्यायांवर विचार करीत आहोत. त्यावर अंतिम निर्णय विद्यापीठाची प्रवेश प्रक्रियेसंबंधी स्थायी समिती घेईल.” जोशी म्हणाले, या पर्यायांत १२ वीचे ५०-५० टक्के गुण प्रवेश परीक्षा घेऊन त्या आधारावर गुणवत्ता बनवली जाईल व ती प्रवेशाचा आधार असेल. एक पर्याय असाही आहे की, वेगवेगळ्या राज्यांचे बोर्ड आपापल्या पद्धतीने परीक्षा घेतात. नंतर परसेंटाइलच्या आधारावर प्रवेश दिला जाईल.
सीबीएसई गुरुवारी न्यायालयात ज्या पर्यायांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून परीक्षेचा निकाल जाहीर करील, ते मांडणार आहे.

प्रोफेसर राजेश यांचे म्हणणे असे की, “दहावी परीक्षेचे निकाल आणि बारावीच्या आंतरिक परीक्षेच्या निकालाचे गुण जोडून प्रवेशाच्या आधी एक संक्षिप्त तोंडी परीक्षा घेतली जावी आणि तिन्ही गुणांची सरासरी काढून त्या आधारावर प्रवेश दिला जावा.”

सीबीएसईने बारावीची परीक्षा रद्द केली; परंतु हरयाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात वगळता महाराष्ट्रासह इतर राज्यांनी अजून राज्याच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

अडचणी कशा सोडविणार ते सांगा?
हुशार विद्यार्थ्यांचे म्हणणे असे की, विद्यापीठात प्रवेश घेताना ज्या अडचणी येतील त्या कशा सोडवणार व प्रवेशाचा आधार कोणता असेल? विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेले विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत. ते म्हणतात की, परीक्षा होेणार नसल्यामुळे विदेशातील विद्यापीठांत आम्हाला कोणत्या आधारावर प्रवेश मिळेल?

Web Title: cancellation of CBSE exams has worried the smart students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.