शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तर गोरेगाव-मुलुंड लिंक रोड वृक्षतोडीची परवानगी रद्द करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:22 IST

सुप्रीम काेर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा; झाडे न लावल्याने नाराजी

नवी दिल्ली : मुंबईत प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून अन्य ठिकाणी योग्य प्रमाणात झाडे न लावल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने  तीव्र नाराजी सोमवारी व्यक्त केली. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड यांसारख्या प्रकल्पांसाठी दिलेल्या वृक्षतोडीच्या सर्व जुन्या परवानग्या रद्द करण्यात येतील, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिली. 

झाडे तोडल्याच्या बदल्यात इतर ठिकाणी झाडे लावण्याचे काम कसे केले जात आहे, त्यासाठी सर्व नियमांचे पालन होत आहे का, याबद्दलची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी सर्व संबंधित घटकांची बैठक बोलावून त्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.याबाबत मुख्य सचिवांनी  ११ नोव्हेंबरपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश सरन्यायाधीश भूषण गवई, न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने दिला आहे. 

प्रतिज्ञापत्रासाठी विनंती

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, झाडे लावण्याच्या कामाकडे संबंधित लोकांचे दुर्लक्ष होत असेल तर मेट्रो रेलसारख्या प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व परवानग्या आम्ही रद्द करू शकतो. 

महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ११ नोव्हेंबरपर्यंत सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. 

वृक्षतोड केल्याच्या बदल्यात अन्य ठिकाणी झाडे लावण्याच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

जीएमएलआर प्रकल्पासाठी एक हजारहून अधिक झाडे तोडावी लागणार

मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, जीएमएलआर प्रकल्पासाठी एकूण एक हजारहून अधिक झाडे तोडावी लागतील. त्यापैकी ६३२ झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, तर ४०७ झाडे कायमची तोडावी लागतील. 

तर पर्यावरण कार्यकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सांगितले की, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात भरपाई स्वरूपात अन्य ठिकाणी झाडे लावण्याचे काम नीटपणे होत नाही. 

फक्त एक फूट उंच रोपे लावली जात आहेत आणि त्यांची सहा महिन्यांनंतर काळजी घेतली जात नाही, त्यामुळे ती मरत आहेत.  जीएमएलआर प्रकल्पासाठी सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी ९५ झाडे तोडण्यास परवानगी दिली.   

English
हिंदी सारांश
Web Title : Cancel Goregaon-Mulund Link Road Tree Felling Permit, Warns Supreme Court

Web Summary : Supreme Court threatens to revoke tree felling permits for Mumbai projects like the Goregaon-Mulund Link Road due to inadequate compensatory planting. The court has ordered Maharashtra's Chief Secretary to submit a report on compliance with tree plantation rules by November 11th.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबई