शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:37 IST

Rajasthan BJP chief Madan Rathore : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभेच्या सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराची धामधूम सुरु आहे. सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचे प्रमुख मदन राठोड यांनी शनिवारी एक मोठे विधान केले आहे. जर खींवसर येथील आरएलपी खासदार हनुमान बेनिवाल यांच्या पत्नी कनिका बेनिवाल खींवसर पोटनिवडणुकीत पराभूत झाल्या, तर हनुमान बेलीवाल यांना त्याचा फायदा होईल, कारण कनिका बेनिवाल घरी राहून त्यांच्या मुलांची काळजी घेतील, असे मदन राठोड यांनी म्हटले आहे.

कनिका बेनीवाल या आरएलपीच्या उमेदवार असून १३ नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक लढवत आहेत. यावरून मदन राठोड यांनी निशाणा साधला. हनुमान बेनिवाल आणि त्यांची पत्नी दोघेही राजकारण करत राहिले तर त्यांच्या कुटुंबाचे काय होईल? असा सवाल मदन राठोड यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सोशल मीडियावर पाहिलं की, ते (हनुमान बेनिवाल) काळजीत दिसत होते की, जर त्यांची पत्नी निवडणूक जिंकली नाही तर त्या आपल्या 'पीहार' (आईवडिलांच्या घरी) जातील. भाऊ, तुम्हाला इतकी भीती वाटत होती. मग तुम्ही (पोटनिवडणुकीत तुमच्या पत्नीला उतरवण्याचा) असा धोका का पत्करला?"

पुढे मदन राठोड  म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे की, त्या जिंकू शकत नाहीत. पण माझा एक सल्ला आहे. हनुमान जी, तुमची पत्नी हरली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी जातील किंवा कुठेही. पण, त्या मुलांचा सांभाळ करतील. मुलांची काळजी घेणे महत्वाचे नाही का? जर तुम्ही दोघे राजकारण करत राहिल्यास कुटुंबाचे काय होईल? हे समजून घेणे आवश्यक आहे." 

काँग्रेसवरही हल्लाबोल मदन राठोड यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेसचे अनेक नेते जामिनावर असून राजकारण करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "काँग्रेस नेते जामिनावर आहेत. त्यांनी मोठे घोटाळे केले आणि त्यांना अटक करण्यात आली. ते जामिनावर आहेत आणि राजकारण करत आहेत." यावेळी मदन राठोड यांनी  सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पी चिदंबरम आणि इतर नेत्यांची नावे घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024