शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक - डॉ. रणदीप गुलेरिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 10:44 IST

Corona Vaccination : कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या ठिकाणी शाळा उघडता येतात, असे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसून येत आहे. तसेच, या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह काही राज्यांत मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु मुलांसाठी देशात अद्याप कोरोना लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

यादरम्यान, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, भारतात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिन्यांचा कालावधी लागेल आणि अशा परिस्थितीत दीर्घकाळ  मुलांच्या भविष्याचे नुकसान करता येणार नाही. मुलांच्या विकासासाठी शाळा उघडणे आवश्यक आहे. कारण मुलांसाठी शारीरिक संपर्क महत्त्वाचा असतो.

कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या ठिकाणी शाळा उघडता येतात, असे शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. याचबरोबर, ते म्हणाले की, सर्व मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा नाही किंवा तशा परिस्थितीचे वातावरण नसते, त्यामुळे शाळा उघडणे आवश्यक आहे. जवळपास सर्व शाळांमधील शिक्षकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, त्यामुळे ही स्थिती सर्वात अनुकूल आहे.

याचबरोबर, सर्व शिक्षकांनी पुढे येऊन स्वत: कोरोनाची लस घ्यावी, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. तसेच, शाळा प्रशासनाला मुलांच्या लंच ब्रेक आणि इतर कोणत्याही वेळी गर्दी होऊ देऊ नये, असे आवाहन डॉ. रणदीप गुलेरिया यांनी  केले आहे. ते म्हणाले की, मुले सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आहेत की नाही, याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी दुसरीकडे, कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता मुलांचे वॉर्ड आणि इतर वैद्यकीय उपकरणे उभारण्याची व्यवस्था केली जात असल्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तयारी जोरात सुरू आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा