शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू शकत नाही, राम मंदिराच्या मुद्द्यावर विहिंपचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:08 IST

देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते.

नवी दिल्ली- देशातल्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आस्था आणि राजकारण नेहमीच होत असते. लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तसे राम मंदिरचा मुद्द्या तापत चालला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेनंही पत्रकार परिषद घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, राम मंदिरासाठी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू समाज आग्रही आहे. ही लोकशाहीची लढाई आहे. संताचा समाज आणि जनता आमच्यासोबत आहे. आम्ही राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. सरकारनं लवकरात लवकर कायदा तयार करावा.प्रयागराजच्या कुंभमेळ्यात 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संत समाज एकत्र येऊन धर्म संसदेत मंदिराच्या मुद्द्यावरील रणनीतीचा निर्णय घेईल. मंदिर मुद्दा हा काँग्रेसनं लटकवल्याचाही आरोप विहिंपनं केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यारून सर्व खासदारांची भेट घेत आहोत. परंतु अद्यापही वाराणसीचे खासदार पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकलेली नाही.तत्पूर्वी एएनआयच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, 70 वर्षं देशात राज्य करणाऱ्या काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा लटकवला आहे. काँग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराच्या मुद्द्यावरून अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळे राम मंदिरचा मुद्दा लटकला आहे. सध्या राम मंदिर हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे, त्यातून बाहेर आल्यानंतर त्यावर योग्य निर्णय घेऊ, असंही मोदींनी काल सांगितलं होतं. तर शिवसेनेसह इतर पक्षांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या