शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉर्म-७’ भरून मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:55 IST

मतदानासाठी यादीत नाव असणे बंधनकारकच

मुंबई : मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीत नाव नसले तरी फॉर्म-७ भरून मतदान करता येते, या आशयाचा मेसेज व्हाट्सअ‍ॅपसह अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मेसेजमधील माहिती खोटी असून मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.समाजमाध्यमांवर फॉर्म ७ भरून मतदान करता येणार असल्याच्या मेसेजबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने खुलासा केला आहे. मतदार यादीतील स्वत:चे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी फॉर्म ७ चा अर्ज केला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेण्यासाठी हा अर्ज वापरला जातो. त्यामुळे हा अर्ज भरून कोणालाही मतदान करता येणार नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर फिरणाऱ्या पोस्टवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यादीत नाव आहे, मात्र मतदार ओळखपत्र नाही, अशा स्थितीत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर अकरा ओळखपत्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक