नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाचा अपमान देश कदापिही सहन करू शकत नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. संविधान व बाबासाहेबांचे कार्य संपवण्याचा डाव भाजपने आखला असल्याचा आरोप गांधींनी केला.
राहुल गांधींनी केलेल्या निदर्शनाची छायाचित्रे व्हॉट्सअॅप चॅनलवर पोस्ट केली. डॉ. बाबासाहेब बाबासाहेब हे देशाचे संविधान निर्माते आहेत. देशाला दिशा देणारे महापुरुष आहेत. त्यांचा अवमान, त्यांनी तयार केलेल्या संविधानाचा अपमान देश सहन करणार नाही, असे स्पष्ट करत गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
भाजप व त्यांचे नेते सुरुवातीपासून संविधान बदलणार असल्याचे सांगत आहेत. ते लोक केवळ संविधानविरोधी नाही तर डॉ. आंबेडकर व त्यांच्या विचारधारेविरोधात आहेत. संविधान व आंबेडकरांनी केलेले कार्य संपवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. याची जाणीव संपूर्ण देशाला आहे. - राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते