शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:56 IST

Nimisha Priya News : येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत.

येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. १६ जुलै रोजी तिला फाशी दिली जाणार असून, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आज एका महत्त्वपूर्ण याचिकेवर सुनावणी करणार आहे. केंद्र सरकारने तातडीने राजनैतिक मार्गांचा वापर करून निमिषाला वाचवावं, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

निमिषा प्रियावर २०१७ मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल याची हत्या केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यासाठी तिला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषाला वाचवण्यासाठी तिचं कुटुंब जीवाचं रान करत आहे.

'ब्लड मनी'वर कोर्टात पेचनिमिषाच्या या गंभीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निमिषाला फाशीपासून वाचवण्यासाठी येमेनमधील पीडित कुटुंबाला 'ब्लड मनी' देण्याचा पर्याय स्वीकारता येईल का, यावर न्यायालय पुन्हा विचार करणार आहे. या याचिकेत युक्तिवाद करण्यात आला आहे की, येमेनमधील शरिया कायद्यानुसार 'ब्लड मनी'ची तरतूद स्वीकारार्ह आहे. न्यायमूर्ती विक्रम सेठ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण १० जुलै रोजी तातडीच्या सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलं होतं.

कोणी दाखल केली याचिका?अधिवक्ता सुभाष चंद्रा के.आर. यांनी निमिषा प्रियाच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. ब्लड मनी दिल्यास पीडित कुटुंब केरळच्या या नर्सला माफ करेल आणि त्यामुळे निमिषाची फाशी थांबेल, असा युक्तिवाद यात करण्यात आला आहे. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने 'ब्लड मनी' म्हणून ८.६ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तलालच्या कुटुंबाने ही रक्कम स्वीकारून निमिषाचा जीव वाचवावा, अशी आशा कुटुंबाला आहे. मात्र, या आधी तलालच्या कुटुंबाने पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता.

२०१७ मध्ये काय घडलं होतं?येमेनमधील न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, जुलै २०१७ मध्ये निमिषा प्रियाने कथितरित्या तिचा स्थानिक व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदी याला अंमली पदार्थ देऊन त्याची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या एका नर्सच्या मदतीने तिने त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि हे अवयव एका भूमिगत टाकीत फेकले. महदीच्या हत्येचा खुलासा झाल्यानंतर निमिषाला अटक करण्यात आली आणि तिने एका निवेदनात हत्येची कबुली दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

येमेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून माफी नाही!सना येथील कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने या निर्णयाला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, परंतु तिचं अपील फेटाळण्यात आलं आणि फाशीची शिक्षा कायम राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषाने नंतर यमनच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेची भीक मागितली, पण त्यांनी तिला माफ करण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मृत तलाल अब्दो मेहदीचं कुटुंब हत्येच्या गुन्ह्यासाठी 'ब्लड मनी' स्वीकारण्यासही तयार नाही, असं म्हटलं जात आहे. निमिषा प्रियासाठी सर्व कायदेशीर प्रयत्न करण्यात आले, पण तिच्याविरुद्धचे आरोप इतके गंभीर होते की, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

टॅग्स :KeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय