शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात ९ राज्यांत प्रचाराचा धुरळा, विधानसभा निवडणुकांतून लोकसभेची ‘लिटमस टेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 06:20 IST

भाजपला राजस्थान व छत्तीसगडमध्येही ताकद वाढवायची आहे, तिथे काँग्रेस सत्तेत आहे.

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : २०२३ या नववर्षात ९ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून, लोकसभेची सेमीफायनल म्हणून याकडे बघितले जात आहे. मोदींचा करिष्मा अजूनही कायम असला, तरी भाजप नेतृत्वाला यातील काही राज्यांत गुजरातप्रमाणे विजय खेचून आणणे कठीण जाणार आहे. त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेशातही भाजपची सत्ता आहे. नागालँड व मिझोराममध्ये सत्ताधारी एनडीपीपी व एमएनएफ हे एनडीएचे भाग आहेत, तर मेघालयात मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचा एनपीपी एनडीएतून बाहेर पडला आहे.

भाजपला राजस्थान व छत्तीसगडमध्येही ताकद वाढवायची आहे, तिथे काँग्रेस सत्तेत आहे. त्रिपुरामध्ये भाजपला आधीच गंभीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे, तेथे भाजपच्या अर्धा डझनहून अधिक आमदारांनी राजीनामा दिला आहे प्रमुख प्रादेशिक मित्रपक्षाने भाजपशी संबंध तोडल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.

मध्य प्रदेशमध्ये आव्हान- भाजपची पुढची मोठी चिंता आहे मध्य प्रदेश. इथे त्यांना प्रतिकूल अहवाल मिळत आहे. या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. शिवराज सिंह चौहान यांना बदलण्याचा पक्ष नेतृत्वाचा विचार आहे. - गुजरातमध्ये सत्ताविरोधी लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह त्यांची पूर्ण टीम निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर बदलली होती. हा प्रयोग यशस्वी झाला आणि पक्षाला तिथे मोठे यश मिळाले. असाच प्रयोग तिथे होणार असेल, तर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. 

कर्नाटकात भाजप स्वबळावर भाजपला स्वबळावर दोन तृतीयांश बहुमत मिळवून कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करता यावे, यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगळुरूमध्ये कार्यक्रमात म्हटले आहे. 

येडियुरप्पा अस्वस्थकर्नाटकात बी.एस. येडियुरप्पा यांना शांत करण्यासाठी व संसदीय मंडळात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपल्या पुत्राला बोम्मई यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, असा येडियुरप्पा यांचा आग्रह आहे. येडियुरप्पा यांच्या मुलाला या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, याबाबत अनिश्चितता कायम आहे.  

टॅग्स :Electionनिवडणूक