शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात जीएसटीचा मुद्दा प्रभावी, व्यापाºयांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:19 IST

गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत जीएसटी हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांनी या टॅक्सला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे नावच दिले आहे.

- महेश खरेसुरत : गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत जीएसटी हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांनी या टॅक्सला ‘गब्बर सिंगटॅक्स’ असे नावच दिले आहे. जीएसटीवरून व्यापारी वर्ग सरकारवर नाराज असल्यामुळे काँग्रेस त्याचा लाभ उठवू पाहात आहे.दुसरीकडे संसद व जीएसटी कौन्सिलच्या बैठकांत काँग्रेसचे प्रतिनिधी जीएसटीला पाठिंबा देत असून, बाहेर आल्यावर व्यापाºयांना भ्रमित करण्यासाठी विरोध दाखवतात. ते तेथे का विरोध दर्शवित नाहीत? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.जीएसटीवर सूरतसह देशातील कपडा व्यापारी नाराज आहेत. त्यांनी आपल्या समस्या अनेकदा सरकारच्या कानावर घातल्या. वित्तमंत्री अरुण जेटली सूरतमध्ये असताना आल्यानंतर कपडा व्यापाºयांनाही भेटले. आता व्यापारी मतदानानंतर १४ डिसेंबर रोजी दिल्लीला जाणार आहेत, पण त्यांची नाराजी कायम आहे.कपडा व्यापाºयांवर काँग्रेसने केले लक्ष केंद्रितसूरतच्या लिंबायत, मजुरा, उधना व चौर्यासी या चार मतदारसंघांत कपडा व्यापाºयांची मोठी संख्या आहे. येथे किमान एका जागी कपडा व्यापाºयाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची मागणीकेली जात होती.भाजपाने तर या मागणीकडे दुर्लक्ष केले, परंतु काँग्रेसने कपडा व्यापाºयाला मजुरामधून तिकीट दिले. काँग्रेसचा प्रत्येक नेता आवर्जून कपडा बाजारात जातो.राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री शैलजा, आनंद शर्मा यांनीही कपडा व्यापाºयांच्या भेटी घेतल्या. आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे २ डिसेंबर रोजी सूरतमध्ये कपडा व्यापाºयांसमवेत चर्चा करणार आहेत.यंदा झटका देणारउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तर अनेक कपडा व्यापाºयांशी घनिष्ठ संबंध आहेत. तेही आले, तेव्हा कपडा व्यापाºयांना भेटले. काही बड्या कपडा व्यापाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जीएसटीच्या मुद्द्यावरून आम्ही भाजपाला झटका देणार आहोत. त्याची सुरुवात सूरतहून होईल.काँग्रेस बुडते जहाजअहमदाबाद : काँग्रेस जी कामे ६०-६५ वर्षांत पूर्ण करू शकली नाही, ती कामे आम्ही ४ वर्षांत पूर्ण करावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे काय? असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला. ते म्हणाले की, आम्ही ४ वर्षांत त्यांच्यापेक्षा अधिक कामे केली आहेत. मात्र, काँग्रेसला सत्य बोलणे अवघड जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस बुडते जहाज झाले आहे. गत साडेतीन वर्षांत काँग्रेस पक्ष २० निवडणुका हरला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी यूपीए सरकारवर हल्ला केला. काँग्रेस भारताची प्रतिमा जगात मलिन करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.आम्ही धर्माचे दलाल नाहीअमरेली / वडोदरा : सोमनाथ मंदिरातील दर्शनानंतर सुरू झालेल्या वादावर राहुल गांधी यांनी आज मौन सोडले आणि आम्ही धर्माचे दलाल नाही, अशा शब्दांत विरोधकांचा समाचार घेतला. धर्माचे प्रमाणपत्र दाखविण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असे सांगतानाच, राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, माझ्या आजीपासून कुटुंब शिवभक्त आहे. धर्म आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते म्हणाले की, विश्वास ही आमची खासगी बाब आहे. आम्ही धर्माची दलाली करत नाहीत. आम्ही याचा राजकारणासाठी वापर करू इच्छित नाहीत.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GSTजीएसटीBJPभाजपा