शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

'तो' हिंसाचार टिपणाऱ्या कॅमेरामन महिलेलाही रडू कोसळलं, तरीही तिनं कर्तव्य बजावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 9:06 PM

केरळमध्ये सबरीमाला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशावरून हिंदू संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं.

तिरुअनंतपूरम- केरळमध्ये सबरीमाला मंदिरात दोन महिलांच्या प्रवेशावरून हिंदू संघटनांनी मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. या हिंसाचारात ही सगळी घटना कॅमेऱ्यात टिपणाऱ्या माध्यम प्रतिनिधीवरही हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे आजूबाजूला हिंसाचार सुरू असतानाही डोळ्यांत पाणी दाटलेल्या या माध्यम प्रतिनिधीनं सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.तिचा तो रडतानाचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा वायरल होत आहे. केरळमधलं स्थानिक वृत्तपत्र असलेल्या मातृभूमीच्या एका महिला कॅमेरामनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. शाजिया अब्दुल रहेमान या पत्रकार महिलेवर शबरीमाला इथल्या आंदोलनादरम्यान हल्ला झाला होता. त्या महिलेच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तिच्यावर हल्ले झाल्याचं स्पष्ट दिसतंय. ही महिला अश्रू लपवण्याचं काम करत होती. शाजिया म्हणते, जेव्हा मला कोणी तरी मागून धक्का मारला, तेव्हा मी अचंबित झाली.हा माझ्या व्यावसायिक करिअरमधला वाईट अनुभव होता. त्यामुळे मला रडू कोसळलं. आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या शाजियाला धमक्या आणि शिव्या घालण्यात आल्या. तिच्यावर हल्ला होत असतानाची घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली. शाजियानं ही घटना कॅमेऱ्यात कैद केल्यानं तिचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिर