भारतात बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केलेली आहे. बांगलादेशाच्या शेजारचे पश्चिम बंगालच नाही तर अगदी मुंबई, पुण्यापर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत. तिथेच त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवस्थेतील भ्रष्टाचाऱ्यांना हाताशी धरून रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी बनविली आहेत. एवढेच नाहीत तर घरेही बांधली आहेत. यापुढे जात आता घुसखोरीचा आरोप असलेली एक महिला आता गावाची सरपंचही बनली आहे.
पश्चिम बंगालच्या रशीदाबाद ग्राम पंचायतची लवली खातून ही सरपंच बनली आहे. तिच्या नागरिकतेवरून वाद वाढत चालला असून ती बांगलादेशी असल्याचा आरोप केला जात आहे. बिना पासपोर्ट ती अवैधरित्या भारतात घुसल्याचेही सांगितले जात आहे. तिचे खरे नाव नासिया शेख असल्याचे सांगितले जात असून स्थानिक निवडणुकीत सहभागी झाल्याने व गावाची प्रमुख बनल्याने तिच्याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. आता कोर्टाने एसडीओंकडून अहवाल मागविला आहे.
रेहाना सुल्ताना हिने २०२४ मध्ये याचिका दाखल केली होती. तिने २०२२ मध्ये ग्राम पंचायत निवडणूक लढविली होती परंतू तिला लवलीकडून पराभूत व्हावे लागले होते. रेहाना ही टीएमसीकडून लढली होती तर लवली ही काँग्रेस व डाव्यांकडून लढली होती. जिंकल्यानंतर लवलीने दोन महिन्यांतच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार लवली खातूनचे खरे नाव नासिया शेख आहे. २०१५ मध्ये खातूनच्या नावावर आधार कार्ड जारी करण्यात आले व २०१८ मध्ये जन्म प्रमाणपत्र बनविण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या आधारावर ही कागदपत्रे बनविण्यात आली आहेत. हे सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्त्या रेहाना यांच्याकडे पुरावे आहेत, असा दावा वकिलांनी केला आहे.
खातून शेजारच्या गावात एका व्यक्तीकडे गेली होती, तिने त्या व्यक्तीला तिचे वडील बनण्यास सांगितले होते. तिच्या वडिलांचे नाव शेख मुस्तफा नाही तर जमील बिस्वास आहे हे सर्वजणांना माहिती आहे. एनआरसीमध्ये देखील शेख मुस्तफाच्या कुटुंबात लवलीचा उल्लेख नाहीय, असे वकिलांनी सांगितले.