शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सभेला आले, पण पैसे नाही मिळाले; संतप्त लोकांनी रास्तारोको केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:42 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपला प्रभाव पडावा यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विविध हातखंडे आजमावण्यात येत आहेत.

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विविध हातखंडे आजमावण्यात येत आहेत. जनमतावर पकड मिळावी यासाठी मोठमोठ्या सभांचे आयोजनही करण्यात येत आहे. मात्र या सभेसाठी माणसे मिळवताना नेतेमंडळींची दमछाक होत आहे. दरम्यान, सभेसाठी जमवलेल्या गर्दीवरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला काल फजितीला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. मात्र सभा आटोपल्यावर संबंधितांकडून पैसे न मिळाल्याने सभेला आलेल्या लोकांनी रास्तारोको केल्याचा प्रकार  समोर आला आहे. त्याचे झाले असे की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची एक मोठी सभा गुरुवारी खम्मम जिल्ह्यात झाली. या सभेसाठी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली. मोठ्या प्रमाणात गर्दी दिसावी यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून वाहने भरून लोकांना सभास्थळी आणण्यात आले. मात्र सभेला आल्यास पैसे देण्यात येतील, असे आश्वासन नेत्यांनी दिल्याचा आरोप अनेकांनी केला. तसेच पैसे न मिळाल्याने सभेला आलेल्या लोकांनी रास्ता रोको करत आंदोलन केले. त्यामुळे तिथे उपस्थित नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील अंडोल येथे सभेमध्ये  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  भाजपा आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच संपूर्ण बहुमताचे सरकार असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्णपणे अपयशी ठरले, असा आरोपही त्यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे अपेक्षेनुरूप विकास करू शकले नाही, असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Politicsराजकारण