शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

'मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणणं म्हणजे देशाचा अन् जनतेचा अपमान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:07 IST

मोदींच्या या प्रयत्नांबद्दल राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे.

ठळक मुद्देराहुल गांधीचं विधान पाहिल्यानंतर एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे टूलकीट तुम्हीच निर्माण केलंय. ज्यापद्धतीच्या भाषेचा वापर, तर्क आणि लोकांमध्ये भीता पसरविण्याचा प्रयत्न, हा त्याच राजकारणाचा भाग आहे, असेही जावडेकर यांनी म्हटलंय. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीसंदर्भात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी, कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदींनी केवळ नौटंकी केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींच्या या आरोपाला भाजपाकडून केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. 

राहुल गांधींनी कोरोनाबाबत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी, मोदींबद्दल बोलताना त्यांनी नौटंकी हा शब्दप्रयोग केला. यावरुन, भाजपाने राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसोबत कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. मोदींच्या या प्रयत्नांबद्दल राहुल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा आणि देशातील जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेनं केव्हाच बंद केलीय, असं प्रकाश जावडेकर यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे म्हटले.  राहुल गांधीचं विधान पाहिल्यानंतर एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे टूलकीट तुम्हीच निर्माण केलंय. ज्यापद्धतीच्या भाषेचा वापर, तर्क आणि लोकांमध्ये भीता पसरविण्याचा प्रयत्न, हा त्याच राजकारणाचा भाग आहे, असेही जावडेकर यांनी म्हटलंय. 

पाहा, व्हिडिओ

दुसऱ्या लाटेला मोदींची नौटंकीच कारणीभूत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचेही ते म्हणाले. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

लसीकरण हाच उपाय

आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. कोरोना हा तोंड वर काढणारा आजार आहे, यावर लॉकडाऊन आणि मास्क हा तात्पुरता उपाय आहे. केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

दरम्यान, देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर अद्याप धोका कायमच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे.      

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकरRahul Gandhiराहुल गांधी