शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना 'BOSS' संबोधणं हा भाषणाचा हिस्सा नव्हता, एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 09:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय परदेश दौऱ्याहून भारतात परत आले.

नवी दिल्ली - प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची जोरदार स्तुती केली. देशातील सर्वांत मोठ्या इनडोअर स्टेडियमपैकी एक असलेल्या कुडोस बँक एरिना येथे आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियातील हजारो भारतीयांनी जोरदार स्वागत केले. अल्बानीज यांनी मोदींची स्तुती करताच टाळ्यांचा एकच कडकडाट केला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भाषणातील स्क्रीप्टमध्ये मोदींना बॉस संबोधण्याचं लिहिलेलं नव्हतं, असे म्हणत त्या भाषणाचा किस्साच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय परदेश दौऱ्याहून भारतात परत आले. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींचे केलेलं कौतुक चर्चेचा विषय ठरला. भारताल आज जगभरातील देश ज्या नजरेतून पाहात आहेत, त्याचं कारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींना बॉस म्हटले, त्या भाषणाचा किस्साही सांगितला.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भाषणावेळी मोदींना द बॉस म्हटले, तो त्यांच्या भाषणाचा हिस्सा नव्हता, ही त्यांच्या मनातून आलेली कौतुकाची थाप होती. या कार्यक्रमानंतर स्वत: पंतप्रधान अल्बानीज यांनी जयशंकर यांच्याशी बोलताना हा किस्सा सांगितला. मोदींना बॉस म्हणणं ही माझ्या मनातील गोष्ट आहे, हा माझ्या भाषणाचा भाग नव्हता, तर माझ्या मनातील भावना होती, असे अल्बानीज यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते पीएम अल्बानीज

पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे त्यांचे रॉकस्टारसारखे स्वागत होते. अमेरिकन रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचा याच ठिकाणी २०१७ मध्ये कार्यक्रम झाला होता. त्यांचेही इतके भव्य स्वागत झाले नव्हते. स्प्रिंगस्टीन यांना त्यांचे फॅन बॉस म्हणून संबोधतात.  

नगराला नाव ‘लिटिल इंडिया’

या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे आमगन होताच लोकांनी ‘मोदी-मोदी’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. मोदी यांनी येथील एका उपनगराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAustraliaआॅस्ट्रेलियाS. Jaishankarएस. जयशंकरprime ministerपंतप्रधान