शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Call Before U-DIG App: PM मोदींनी लॉन्च केले U-DIG ॲप; सरकारचे 3000 कोटी रुपये वाचणार, जाणून घ्या याचे काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:19 IST

Call Before U-DIG App: पीएम मोदींनी आज विज्ञान भवनात 6G व्हिजन डॉक्यूमेंट आणि U-DIG अॅप्लिकेशन लॉन्च केले.

Call Before U-DIG App: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 6G व्हिजन डॉक्युमेंट लाँच केले. यासोबतच पंतप्रधानांनी कॉल बिफोर यू-डीआयजी(Call Before U-DIG) नावाचे मोबाईल अॅप्लिकेशनही लॉन्च केले. या अॅपचा पुढाकार दूरसंचार विभागाने घेतला आहे. हे अॅप सरकारचे पैसे वाचवता यावेत म्हणून सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशात कोणताही नवा प्रकल्प किंवा निविदा निघाल्यास त्या प्रकल्पाचे काम थेट एजन्सी सुरू करत असे.

अशा स्थितीत खोदकाम सुरू असताना जमिनीखालील भूमिगत केबल किंवा पाइपलाइन खराब झाल्याने हजारो कोटींचे नुकसान व्हायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, दरवर्षी विकासाशी संबंधित कामे करताना भूमिगत केबल्स तुटल्यामुळे किंवा पाइपलाइन खराब झाल्यामुळे सरकारला सुमारे 3,000 कोटींचे नुकसान सहन करावे लागते.

हा आहे U-DIG चा फायदा ?हे सर्व टाळण्यासाठी आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा वाचवण्यासाठी दूरसंचार विभागाने यू-डीआयजी मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अंतर्गत खोदकाम करणार्‍या एजन्सी किंवा टेलिकॉम कंपन्यांना ते काम करणार आहेत, त्या भागात कोणत्या कंपनीची पाइपलाइन किंवा केबल लाइन टाकली आहे का आणि त्या कंपनीची माहिती आधीच मिळेल. केबल किंवा पाइपलाइन लक्षात घेऊन काम केले जाईल आणि सरकारी आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही. अनेकवेळा अशा गोष्टींमुळे नागरिकांनाही अनेक दिवस समस्यांना सामोरे जावे लागते.

संबंधित बातमी- 4G-5G विसरा अन् 6G च्या तयारी लागा; PM मोदींनी लॉन्च केले 6G व्हिजन डॉक्यूमेंट, जाणून घ्या माहिती...

सोप्या शब्दात समजावून सांगायचे झाल्यास, समजा तुमच्या परिसरात रस्त्याचे किंवा भुयारी गटाराचे काम सुरू करायचे असेल, तर आधी खोदकाम केले जाते. आतापर्यंत खोदकाम करणाऱ्या एजन्सी थेट कामाला सुरुवात करत असत. अशा परिस्थितीत अनेक वेळा जमिनीखाली टाकलेली पाइपलाइन किंवा वायर खराब व्हायची. पण आता U-DIG अॅप सुरू झाल्यानंतर असे होणार नाही आणि नुकसान कमी करता येईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा