शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारला १३ तारीख नसणारे कॅलेंडर !

By admin | Updated: November 13, 2015 12:26 IST

शकून-अपशकूनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची दुनिया वेगळी असते. तारीख १३ आणि शुक्रवार म्हणजे काही तरी आक्रित घडणार अशा अजब भयाने ग्रस्त असलेल्यांची संख्याही जगात कमी नाहीय.

नवी दिल्ली : शकून-अपशकूनांवर विश्वास ठेवणाऱ्यांची दुनिया वेगळी असते. तारीख १३ आणि शुक्रवार म्हणजे काही तरी आक्रित घडणार अशा अजब भयाने ग्रस्त असलेल्यांची संख्याही जगात कमी नाहीय. हे भय निर्माण होण्याचे नेमके कारण कुणालाही सांगता यायचे नाही, मात्र या भयग्रस्ततेला ‘फ्रायगेट्राइस्काइडेकाफोबिक’ असे लांबलचक नाव देण्यात आले आहे. असा अनिष्टकारी योग टाळण्यासाठी ही तारीख शुक्रवारला येऊच नये आणि संबंधितांचे भय दूर राहील, असे एक कॅलेंडरच तयार करण्यात आले आहे.भारतीय वायुदलाचे माजी अधिकारी बृजभूषण विज यांनी नामी शक्कल काढत खास कॅलेंडर तयार केले. विशेष म्हणजे त्यांनी कालदर्शिका तयार करण्याच्या या कामाची नोंद १९९४ मध्ये लिम्का बुकात करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्या कालदर्शिकेत कधीही १३ तारीख शुक्रवारी येणार नाही, कारण आठवड्याची सुरुवात सोमवारपासून केलेली असते. संक्रांतीला शुक्रवार येत असल्यास त्या दिवासापासून मी तारखेचा प्रारंभ करतो. नव्या कॅलेंडरची सुरुवात सोमवारपासून होईल, अशा पद्धतीने योजना केलेली असते. सर्व साधारण कालदर्शिकेत दिवस सर्वसाधारणपणे सुरू असतात त्यामुळे अडीच दिवस आपसूक सामावून घेतले जातात. शुक्रवारपासून सोमवारपर्यंतचा अडीच दिवसांचा काळ हटविला जावा, अशीच माझी संकल्पना राहात असल्यामुळे कधीही शुक्रवारी १३ तारीख येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था) २९ फेब्रुवारीला वाढदिवस... ‘डोन्ट वरी’विज यांच्या कॅलेंडरनुसार २९ फेब्रुवारीला वाढदिवस असेल तरी ‘डोन्ट वरी’. तुम्हाला दरवर्षी केक कापता येईल. तुम्ही सध्याच्या जॉर्जियन कॅलेंडरमध्ये कोणताही बदल केला नाही तरी चालेल. मी केवळ ३१ जुलै ही तारीख हटवून त्याऐवजी २९ फेब्रुवारी केली आहे. नेहमीच्या कॅलेंडरमध्ये चारने भाग जात असलेले लीपवर्ष येत असते. आमच्या कॅलेंडरमध्ये हा लीप दिवस ३० जून आणि १ जुलैदरम्यान येतो. त्यामुळे दरवर्षी २९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करता येतो.४५ वर्षांपासून अभ्यास सुरूच...सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या विज यांनी त्यांच्या कॅलेंडरमध्ये मिनिट आणि तासांचे दशांश मोजण्याचे तंत्र अवलंबले. त्यात दिवसांचे २४ तास आणि आठवड्याच्ता रचनेत कोणताही बदल नाही. मी भारतात असतानाही हा विचार मांडला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री जगजीवन राम यांनी हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला. अनेक लेखांमधून मी माझ्या कालदर्शिकेची पद्धत सांगण्याचा प्रयत्न केला पण ही कालदर्शिका कुणीही अवलंबली नाही, असेही ते म्हणाले. १९७०पासून मी कॅलेंडरमध्ये सुधारणा घडविण्याचे प्रयत्न चालविले होते. मी अमेरिकेत अमेरिकन मेट्रिट असोसिएशनकडे माझे विचार मांडल्यानंतर २००२ पासून कॅलेंडर-एल समूहाने त्यावर चर्चा सुरू केली आहे. गेल्या ४५ वर्षांपासून मी माझे काम थांबविलेले नाही. माझे कॅलेंडर स्वीकारण्यासाठी आणखी काही काळ लागेल. माझा अभ्यास शास्त्रीय आधारावर असून सध्याच्या खगोल गणिताशी तो जुळणारा आहे, असा ठाम दावाही त्यांनी केला.