शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कॅग : नव्या करारामुळे राफेल स्वस्त; विरोधक : हा सरकारधार्जिणा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 5:42 AM

हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने घेण्यासाठी मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच ७.६ अब्ज युरो खर्चाच्या या खरेदी व्यवहाराची छाननी करणारा भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा (कॅग) बहुप्रतीक्षित अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदे सादर झाला.

नवी दिल्ली : हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने घेण्यासाठी मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच ७.६ अब्ज युरो खर्चाच्या या खरेदी व्यवहाराची छाननी करणारा भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा (कॅग) बहुप्रतीक्षित अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदे सादर झाला. काही बाबतीत नाराजी व नापसंतीचा सूर लावणारा हा अहवाल सरकारधार्जिणा आहे, असा आरोप विरोधकांनी केला. अहवाल आल्यानंतर हा वाद शमण्याऐवजी तो नव्याने सुरू झाला.आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरू केलेली व अर्धवट राहिलेली राफेल खरेदीची प्रक्रिया मोडीत काढून आम्ही थेट फ्रान्स सरकारशी केलेला करार अधिक फायदेशीर आहे, या मोदी सरकारच्या दाव्यास हा अहवाल पुष्टी देत असला, तरी सरकारच्या पदरी पडलेले हे श्रेय जुजबी आहे. जुन्या व नव्या करारांची तुलना करता ही विमानखरेदी फक्त २.८६ टक्के स्वस्तात होणार आहे. त्यातही निव्वळ विमानांच्या किमतीत काहीच फरक पडला नसून, खर्चात होणारी थोडी-फार बचत या विमानांना बसवून दिल्या जाणाऱ्या भारतासाठीच्या खास यंत्रणांच्या बाबतीत आहे, असे ‘कॅग’ने नमूद केले. करारात गोपनीयतेचे कलम असल्याने अहवालातही प्रत्यक्ष किमतीचा उल्लेख नाही. व्यवहारातील काही बाबी ‘कॅग’ला खटकल्या आहेत. विमाने पुरविणाºया दस्सॉल्ट कंपनीला लाभ होणार असल्याने सरकारला दूषणे देत काही गोष्टी टाळल्या असत्या, तर करार अधिक लाभदायी झाला असता, असा सूर लावला आहे. पुरवठदार कंपनीच्या कामाच्या हमीपोटी फ्रान्स सरकारकडून सार्वभौम हमी घेण्याऐवजी फक्त आश्वासनाचे पत्र घेणे, कंपनीस दिली जाणारी अग्रीम रक्कम अन्यत्र वळविली जाणार नाही, याच्या खात्रीसाठी बँक गॅरन्टी न घेणे, पैसे फ्रान्स सरकारच्या संमतीनंतर फक्त त्यासाठी असलेल्या एस्क्रो खात्यातून देण्याऐवजी थेट कंपनीस देणे व विमानासोबत घेतली जाणारी १३ विशेष साहित्ये, त्यापैकी चार नको असे हवाईदलाने सांगूनही करारात त्याचा समावेश करणे, या बाबी यात प्रकर्षाने नमूद केल्या आहेत.या सर्व गोष्टी फ्रान्स सरकार व कंपनीचा नकार मान्य करून मोदी सरकारने केल्या, ही नोंदही लक्षणीय आहे. यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी, कॅगच्या अहवालामुळे महाजूठबंधनचा खोटारडेपणा उघडा पडला आहे, असा टोला लगावला.राहुल गांधी यांनी जारी केला व्हिडीओसंरक्षण मंत्रालयाने राफेलच्या करारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांचा आक्षेप असलेले टिपण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केले. सदस्य कोस्ट सल्लागार एम.पी. सिंह, अर्थ व्यवस्थापक ए. आर. सुळे, अर्थ व्यवस्थापक (हवाई दल) आणि संयुक्त सचिव राजीव वर्मा यांनी एक जून, २०१६ रोजी राफेलविमानांच्या खरेदीसाठी बनविलेल्या फाइलवर आक्षेप नोंदविला होता. हा आक्षेप करार करणाºया टीमचे अध्यक्ष असलेले डेप्युटी चीफ आॅफ एअर स्टाफ यांना पाठविला गेला, असे या टिपणातून स्पष्ट होते.

 

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डील