शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं; तीन हजार कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:14 IST

कॅगकडून मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे

नवी दिल्ली: देशभरातील एम्स रुग्णालयांची उभारणी अतिशय संथ गतीनं सुरू असल्याचं कॅगनं अहवालात म्हटलं आहे. एम्स रुग्णालयांची उभारणी कासव गतीनं सुरू असल्यानं त्यांच्या निर्मितीचा खर्च 3 हजार कोटी रुपयांनी वाढला आहे, असंदेखील कॅगनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या 'गतीमान' कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत एम्स रुग्णालयांची उभारणी केली जाते. मात्र या योजनेअंतर्गत घोषणा करण्यात आलेल्या एम्स रुग्णालयांची बांधकामं अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. सरकारच्या कारभारातील याच त्रुटींवर कॅगनं प्रकाश टाकला आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत येणाऱ्या अनेक प्रकल्पांचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याचं कॅगनं म्हटलं आहे. याला प्रशासकीय उदासीनता, देखरेख करणाऱ्या यंत्रणेचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचं कॅगनं अहवालात नमूद केलं आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत पुढील 15 वर्षांमध्ये देशभरात एम्ससारख्या संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. याच योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेली वैद्यकीय महाविद्यालयं आणि संस्था यांचंही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मात्र हे काम अतिशय संथपणे सुरू असल्याचे ताशेरे कॅगनं ओढले आहेत. एम्स रुग्णालयांच्या उभारणीचं काम निर्धारित वेळेपेक्षा चार ते सहा वर्ष उशिरानं होत असल्याचं कॅगनं अहवालात म्हटलं आहे. 2016-17 मध्ये सहा नवी एम्स रुग्णालयं सुरू करण्यासाठी सरकारनं 14,970 रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र हा निधी उशिरानं संबंधित विभागांना पोहोचला. त्यामुळे झालेल्या विलंबामुळे रुग्णालयांच्या उभारणीचा खर्च 2,928 कोटी रुपयांनी वाढला आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNarendra Modiनरेंद्र मोदीMedicalवैद्यकीय