शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटींच्या नव्या योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत, बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 12:25 IST

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे.

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पाम ऑईल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यावर एकूण ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत दरवर्षी २.५ कोटींची भर पडते. त्यानुसार खाद्य तेलाच्या विक्रीतही दरवर्षाला ३ ते ३.५ टक्के टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकार ६० ते ७० हजार कोटी खर्च करून १.५ कोटी टन खाद्यतेल आयात करत आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता दरवर्षी देशात २.५ कोटी टन खाद्य तेलाची गरज भासते. 

भारतात खाद्य तेलामध्ये सोया आणि पाम तेलाची सर्वाधिक विक्री होते. पाम तेलाची एकूण आयात ४० टक्के इतकी आहे. तर एकूण गरजेपैकी ३३ टक्के सोयाबिन तेल आपण आयात करतो. सोयाबीन तेल भारत अर्जेंटिना आणि ब्राझीलहून आयात करतो. पामतेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगात दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर मलेशियाचा दुसरा क्रमांक लागतो. आफ्रिकेतील काही देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन केलं जातं. खाद्यतेलातील भारताच्या आयाती पैकी दोन तृतियांश हिस्सा तर केवळ पाम तेलाचा आहे. भारत दरवर्षी जवळपास ९० लाख टन पाम तेल आयात कतं. भारतात इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमधून तेल आयात केलं जातं. 

मोदी सरकार नेमकं काय करणार?राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत मोदी सरकार पाम तेलाचं उत्पादन वाढविण्यावर जोर देणार आहे. भारतात तेलबियांचं संवर्धन खूप कमी प्रमाणात होतं. त्यात वाढ करण्याचा सरकारचा इरादा आहे. तेलबियांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार पुढाकार घेणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होईल यादृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. याआधी भारतानं डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. 

आगामी काळात खाद्यतेलाची आयात करावी लागणार नाही यासाठी दिर्घकालीन योजना तयार करण्याच्या सूचना कृषि मंत्रालयाला देण्यात आल्या होत्या. याच हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नूकतच पाम तेल उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील असं म्हटलं होतं. चांगल्या गुणवत्तेच्या तेलबिया, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्र सहाय्य दिलं जाईल असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प