शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आता चिटफंडमध्ये फसणार नाही आपला पैसा, मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 08:51 IST

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शारदा घोटाळ्यावरून सुरू असलेल्या वादादरम्यानच मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शारदा घोटाळ्यावरून सुरू असलेल्या वादादरम्यानच मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आपला पैसा आता चिटफंड सारख्या योजनांमध्ये फसणार नाही. चिटफंड(पोंजी) योजनेला लगाम घालण्यासाठी मोदी मंत्रिमंडळानं अनरेग्युलेटेड डिपॉझिट योजना प्रतिबंध बिल 2018मध्ये दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आपण कुठल्याही नोंदणीकृत नसलेल्या योजनेत पैसे गुंतवल्यास ती योजना अवैध ठरवली जाणार आहे. या नियमांचं पालन करत कंपनीच्या संचालकांची संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ज्या ठेव गुंतवणूक योजना नोंदणीकृत नाहीत, त्या अनधिकृत ठेव योजना असतील. त्यामुळे आता कोणीही चिटफंडसारख्या योजना चालवू शकणार नाही. असे करणाऱ्यांची संपत्ती विकून लोकांना त्यांचे पैसे परत केले जातील. या दुरुस्ती कायद्यांतर्गत अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाहिरात दिल्यास किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्याही मोठ्या हस्तीला ब्रँड अँबेसेडर बनवलं, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.2015 ते 2018पर्यंत सीबीआयनं चिटफंड प्रकरणात जवळपास 166 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यातील सर्वाधिक प्रकरणं ही पश्चिम बंगाल आणि ओडिशातील आहेत. पश्चिम बंगालमधल्या शारदा घोटाळ्याचं प्रकरण हे भाजपा सरकारच्या आधीच्या काळात घडलं आहे. या चिटफंड योजनांचा बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या राज्यांवर मोठा प्रभाव पडत आहे. चिटफंड योजना सुरू करणाऱ्या कंपन्यांचा ऑनलाइन डेटाबेस बनवला जाणार आहे. जेणेकरून सर्वकाही नोंदणीकृत होईल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी