शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest: हे तर चोर! अंथरुणं जप्त करणाऱ्या पोलिसांविरोधात महिला आंदोलकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 15:38 IST

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई कॅमेऱ्यात कैद; महिलांची जोरदार घोषणाबाजी

लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनऊमधल्या घंटाघर परिसरात आंदोलन सुरू आहे. या भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. डिफेन्स एक्प्सोमुळे कलम १४४ लागू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आंदोलनकर्त्यांकडील खाद्यपदार्थ, त्यांची अंथरुणं पोलिसांनी जप्त केली आहेत. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लखनऊमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात महिलांचं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. या महिलांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी बळाचा वापर सुरू असल्याचं काही व्हिडीओंमधून दिसत आहे. अनेक महिलांसोबत त्यांची लहान मुलंदेखील आंदोलनात सहभागी झाली आहेत. त्यांना हटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.  शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास १०-१२ महिलांनी घंटाघर परिसरात आंदोलन सुरू करण्यात सुरुवात केली. या परिसराला वारसास्थळाचा दर्जा आहे. त्यामुळे बरेच पर्यटक या भागाला भेट देतात. शुक्रवारी १०-१२ महिलांचं आंदोलन सुरू असताना संध्याकाळच्या सुमारास परिसरात फिरायला आलेल्या आणखी काही महिलादेखील आंदोलनात सहभागी झाल्या. शनिवारी जवळपास आणखी ५०० महिला आंदोलनात सामील झाल्या. सध्या आंदोलनस्थळी एक हजारपेक्षा अधिक महिला असून यातल्या बहुतांश महिला लखनऊच्या आहेत. जेवण आणि अंथरुणं आणून देणाऱ्या कुटुंबीयांना पोलीस आंदोलनस्थळापर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप महिलांनी केला. आपल्याकडे असलेली अंथरुणं, खाद्यपदार्थ पोलिसांकडून काढून घेतले जात असल्याचा दावादेखील काही महिलांनी केला. पोलीस महिलांकडील अंथरुणं नेत असल्याचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी अंथरुणं आणि अन्नपदार्थ जप्त केल्यानं अनेक महिला रात्री घरी परतल्या. मात्र दुसऱ्या दिवशी आधीपेक्षाही जास्त महिला आंदोलनस्थळी दाखल झाल्या. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश