शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

CAA Protest : उत्तर प्रदेशात 24 तासांत 5 आंदोलकांचा मृत्यू; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 20:15 IST

Citizen Amendment Act : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण

लखनऊ: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज आंदोलनांना हिंसक वळण लागलं. गेल्या २४ तासांमध्ये ५ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मेरठमध्ये आज आंदोलकांनी एका पोलीस चौकीला आग लावली. याशिवाय इतर काही ठिकाणीदेखील आंदोलनांना गालबोट लागलं. उत्तर प्रदेशात लागोपाठ दुसऱ्या दिवशी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनांला हिंसक वळण लागलं. बिजनोरमध्ये एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला. तर ८ पोलीस कर्मचारी जखमी झाले. राज्यात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनांदरम्यान आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू आज झाला. बिजनोरमध्ये दोन आंदोलकांचा, तर लखनऊ, कानपूर, संभल आणि फिरोजाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.  बिजनोरच्या नटहौरमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत ८ कर्मचारी जखमी झाले. याशिवाय फिरोजाबाद, गोरखपूर, मेरठ, गाजियाबाद, हापूड, बहराईच, मुझफ्फरपूर, कानपूर, उन्नाव, भदोहीमध्येही उग्र आंदोलनं झाली. कानपूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कानपूरमध्ये पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकUttar Pradeshउत्तर प्रदेश