शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:04 IST

CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (CAA) सध्या देशातील वातावरण तापले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यात आहे. मात्र CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असली तरी या कायद्यातील मूळ तरतुदी बदललेल्या नाहीत, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताप्रति आस्था आणि श्रद्धा असणारे आणि भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जगातील सर्व पंथाच्या व्यक्तींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी यापूर्वी जी प्रक्रिया अस्तित्वात होती, ती आजही कायम आहे,'' 

 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये सरकारने गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. तसेच सध्या वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. हा कायदा करून सरकारने महात्मा गांधींच्या इच्छेची पूर्तता केली, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन

पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, ''भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारतbudget 2020बजेट