शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कमी किंमत असूनही फक्त ३६ विमानांचीच खरेदी का? चिदंबरम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:27 IST

पी. चिदम्बरम यांचा सवाल : १२६ राफेल विमानांची खरेदी का नाही?

कराईकुडी : राफेल विमाने कमी किमतीत मिळत असल्याचा दावा मोदी सरकार करीत आहे, ते जर खरे असेल तर केवळ ३६ लढाऊ विमानेच का खरेदी करण्यात येत आहेत, असा सवाल माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी उपस्थित केला.पत्रकारांना त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारने १२६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचे ठरविले होते व तसा करारही केला होता. मात्र, एनडीए सरकारने तो करार रद्द करून नवीन करार केला. राफेल विमानांची किंमत पूर्वीपेक्षा किती कमी झाली, हे मोदी सरकारने जाहीर केले पाहिजे. कमी किंमत असूनही फक्त ३६ राफेल विमानेच का खरेदी करण्यात येत आहेत, हा प्रश्न त्यामुळेच उपस्थित झाला आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना संरक्षण खात्यातील खरेदीबाबत अनेकदा काहीच माहीत नसते असा आरोप करून चिदम्बरम म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात संरक्षण मंत्रालयाचा कारभार तीन केंद्रीय मंत्र्यांकडून पाहिला गेला; पण त्यातील एकानेही तो धडपणे केला नाही. राफेल विमान बनविणाऱ्या डेसॉल्ट एव्हिएशन या कंपनीला भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड करण्यास भारत सरकारनेच सांगितले होते, असे वक्तव्य फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांनी नुकतेच केले. त्यावरून भारतात राजकीय वादळ उठले आहे. राफेलच्या मुद्यावरुन राजकारण ढवळून निघाले आहे. राफेलच्या व्यवहारावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारवर सातत्याने हल्ले चालविले आहेत. दसॉल्ट कंपनीची भागीदार म्हणून भारत सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सचे नाव सुचवले होते, असे फ्रान्सचे माजी अध्यक्ष होलांद यांनी सांगितल्यानंतर तर विरोधकांनी सरकारवरची टीका तीव्र केली आहे.

सरकारकडून मात्र राफेल व्यवहाराचे सातत्याने समर्थन केले जात आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी म्हटले आहे की, भागीदाराची निवड सरकारकडून नव्हे तर उपकरण तयार करणाऱ्या कंपनीकडून होते. तरीही या मुद्यावरुन विरोधकांचे समाधान झालेले नाही. या मुद्यावर मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधक करीत आहेत. (वृत्तसंस्था)मंत्र्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगतीच्यूपीएच्या कारकीर्दीतील राफेल विमानांच्या किमतीपेक्षा २० टक्के कमी दराने एनडीए सरकार ही विमाने खरेदी करणार आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले होते.च्त्याआधी २०१५ साली तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले की, एनडीए सरकार फक्त ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा स्वस्तात मिळूनही १२६ ऐवजी ३६ विमानेच का घेतली जात आहेत, असा प्रश्न पडल्याचे चिदम्बरम म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमRafale Dealराफेल डील