शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घराची खरेदी करा ऑनलाइन; ‘नारडेको’च्या पोर्टलवर देशातील घरांची माहिती मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 04:12 IST

या पोर्टलवर बांधकाम व्यावसायिक सर्वोत्तम प्रस्ताव देऊ शकतील. ग्राहक पोर्टलवरूनच २५ हजार रुपये भरून घर बुक करू शकतील.

नवी दिल्ली : ‘नॅशनल रिअर इस्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (नारेडको) देशातील पहिले ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर बांधून तयार असलेल्या घरांची माहिती बांधकाम व्यावसायिक टाकू शकतील, तसेच ग्राहक तेथून घरे खरेदी करू शकतील.

पुढील एक महिना बांधकाम व्यावसायिक पोर्टलवर घरांचा तपशील टाकू शकतील. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घरांचा तपशीलच पोर्टलवर टाकता येईल. त्यानंतर, ४५ दिवस ही घरे विक्रीसाठी उपलब्ध असतील. पहिल्या १५ दिवसांत खरेदीदार प्रस्ताव पाहू शकतील, तसेच घरे शॉर्टलिस्ट करू शकतील. १ मार्च ते ३१ मार्च या काळात त्यांना प्रत्यक्ष घरखरेदीही करता येतील. केंद्रीय गृहनिर्माण सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी हे पोर्टल रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अ‍ॅमेझॉनसारखे काम करेल, असे म्हटले आहे. जाणकारांना वाटते की, लोक आॅनलाइन घरे खरेदी करणार नाहीत. तथापि, त्यांना उपलब्ध घरांची विस्तृत माहिती मिळण्यास पोर्टलची मदत होईल.

नारेडकोने म्हटले की, या पोर्टलवर बांधकाम व्यावसायिक सर्वोत्तम प्रस्ताव देऊ शकतील. ग्राहक पोर्टलवरूनच २५ हजार रुपये भरून घर बुक करू शकतील. बुकिंग रक्कम पूर्णत: परत मिळू शकेल. या पोर्टलवर किमान १ हजार प्रकल्प नोंदणीकृत आहेत.पोर्टलचे लाँचिंग करताना मिश्रा यांनी सांगितले की, संभाव्य घर खरेदीदारांसाठी हे मोठे पाऊल आहे. मी सर्व संबंधितांशी चर्चा केली आहे. मी त्यांना सांगितले की, पोर्टलवर विश्वासार्हता महत्त्वाची आहे. घर खरेदीदारास स्थळ आणि किंमत याबाबतची यथार्थ माहिती पोर्टलवर मिळायला हवी.