शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 23:28 IST

या हल्ल्यानंतर, संबंधित आरोपी हा भाजपचा औपचारिक सदस्य असल्याचा आरोप आप कत आहे. मात्र, दिल्ली पोलिसानी हा आरोपी बस मार्शल असून त्याने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकल्याचे म्हटले आहे.

आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये केजरीवाल यांच्यावर झालेला हा हल्ला, इतर कुणी नव्हे तर एका बस मार्शलने केला होता. तसेच, केजरीवाल यांच्यावर फेकलेले द्रव पाणी होते. अरविंद केजरीवाल ग्रेटर कैलासमध्ये पदयात्रा करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपीला पकडले होते. अशोक झा असे या आरोपीचे नाव आहे. 

या हल्ल्यानंतर, संबंधित आरोपी हा भाजपचा औपचारिक सदस्य असल्याचा आरोप आप कत आहे. मात्र, दिल्ली पोलिसानी हा आरोपी बस मार्शल असून त्याने केजरीवाल यांच्यावर पाणी फेकल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आप नेत्यांनी मालवीय नगर भागात पदयात्रेचे आयोजन केले होते, परंतु त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. चौपाल सावित्री नगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा मेघना मोटर सावित्री नगर येथे संपली. या यात्रेत अरविंद केजरीवाल प्रमुख पाहुणे म्हणून होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल सायंकाळी 5.50 वाजताच्या सुमारास लोकांशी हस्तांदोलन करत होते. दरम्यान, अशोक झा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे आधीच पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने आरोपीला तत्काळ पकडून ताब्यात घेण्यात आले. ही व्यक्ती खानापूर आगारात बस मार्शल म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने अरविंद केजरीवाल यांच्यावर पाणी का फेकले याचा अधिक तपास केला जात आहे.

आपनं सांगितली अशी कहाणी - अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेली त्यांनी, अरविंद केजरीवाल यांच्यावर कथित द्रव फेकणारी व्यक्ती भाजपची सदस्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोपीच्या फेसबुक प्रोफाईलवरून आरोपी भाजपचा सदस्य असल्याचे समते. आरोपीच्या एका हातात स्पिरिट आणि दुसऱ्या हातात माचिस होती. तो प्रिरिट फेकण्यात तर यशस्वी झाला पण पेटवू शकला नाही. त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीPoliceपोलिस