शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बस थेट ३०० फूट खोल दरीत; ३८ प्रवासी ठार, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 06:56 IST

राष्ट्रीय महामार्गावर त्रिंगुल-आसारजवळ हा अपघात झाला. त्यानंतर बचावरकार्य जोरात सुरू होते.

दोडा : घाट पार करताना प्रवाशांना रस्त्याच्या कडेने जात असतानाच बस थेट ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची भीषण दुर्घटना जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात घडली. बुधवारी सकाळी ११.५० वाजताच्या या घटनेत ३८ प्रवासी ठार झाले असून २० जण जखमी झाले. किश्तवाडहून जम्मूला जाणाऱ्या या बसमध्ये ५८ जण होते, अशी माहिती आहे. राष्ट्रीय महामार्गावर त्रिंगुल-आसारजवळ हा अपघात झाला. त्यानंतर बचावरकार्य जोरात सुरू होते. त्यातील काही मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही या बसची संपूर्ण माहिती घेतली. बस योग्य प्रकारे चालवली जात नव्हती. पहिल्यांदा ती अपघातरोधी कठड्याला धडकली. नंतर ती बस दरीत कोसळी, असेही त्यांनी सांगितले. दुर्दैवी दुर्घटनेत मृत पावलेल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार मदत दिली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. 

बसमध्ये अतिरिक्त प्रवासी : अपघातग्रस्त बसमध्ये अतिरिक्त प्रवासी होते. घाटात बसला यू-टर्न घ्यायचा होता. ते करत असताना बसने रस्ता सोडला आणि ती थेट घाटात कोसळली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Accidentअपघात