शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 09:23 IST

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे.

भुवनेश्वरः वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी आहेत. पाच जणांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला, तर पाच जणांचा एमकेसीजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती गंजामचे जिल्हाधिकारी विजय अमृत कुलांगे आणि ब्रह्मपूर पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे. एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असतानाच झाला. तसेच जखमींपैकी पाच जणांची परिस्थिती नाजूक आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, ती बस जंगलपाडूहून चिकरादाला जात असताना ही घटना मनदाराजपूरमध्ये घडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. बसमधील लोक जवळच असलेल्या गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचदरम्यान 11 किलोवॉटच्या क्षमतेची वीजेची तार बसच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागली. अग्निशामक दलाचे अधिकारी सुकांत सेठी यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून, बसमधील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बसच्या टपावर सामान होतं, बसचालकानं रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात असतानाच वीजतारेच्या संपर्कात आली. सीएमनं व्यक्त केलं दुःख; भरपाईची घोषणाओडिशातल्या नवीन पटनायक सरकारनं या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन दोन लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर विनाशुल्क उपचार करण्याचीही घोषणा केली आहे.