लखनौ : दुसऱ्या जातीच्या मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून अभिषेक ऊर्फ मोनू (२०) या दलित तरुणाला उत्तर प्रदेशातील हरदोई गावात जिवंत जाळून टाकल्याच्या घटनेचे वर्णन बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्ष मायावती यांनी क्रूर आणि निषेधार्थ अशा शब्दांत केले. या घटनेतील गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी मायावती यांनी बुधवारी टिष्ट्वटरद्वारे केली.शनिवारी काही लोकांनी अभिषेकला मारहाण केली व घरात डांबून ठेवले. नंतर त्याला पेटवून दिले. त्याला गंभीर जखमी अवस्थेत लखनौला रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी त्याचा मृत्यू झाला.मायावती टिष्ट्वटरवर म्हणाल्या की, ‘प्रेम प्रकरणावरून जातीच्या नावाने दलित तरुणाला जिवंत जाळून टाकणे हे भयंकर क्रूर आणि अत्यंत निषेधार्थ आहे. सरकारने गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा केली पाहिजे. म्हणजे राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.’ पोलीस अधीक्षक अलोक प्रियदर्शी यांनी त्यांना स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक ऊर्फ मोनू हा एका मुलीच्या प्रेमात होता व ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा तो तिला भेटायला गेला होता.मोनूच्या भयानक मृत्यूचे वृत्त समजताच त्याच्या आईचा धक्क्याने मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)
दलित तरुणाला जिवंत जाळणे भयंकर : मायावती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:04 IST