शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जादू दाखवतो म्हणत तरुणाला संध्याकाळी जमिनीत गाडलं; सकाळी पुन्हा खड्डा खणला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:41 IST

१२ तास तरुण खड्ड्यात जिवंत राहील असा दावा करण्यात आला होता; सकाळी पुन्हा खड्डा खणण्यात आला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला

पाटणा: बिहारची शेखपुरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. जादूचा प्रयोग एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शेखोपूरसरायमधील वीरपूर गावात हा प्रकार घडला. जादूच्या प्रयोगादरम्यान मृत्यूमुखी पडलेला तरुण याच गावचा आहे. त्याचं नाव धीरज रविदास होतं. तो १८ वर्षांचा होता. रविदासला जमिनीत गाडून १२ तासांनी त्याला जिवंत बाहेर काढण्याचा दावा जादूगारानं केला होता. १२ तासांनी पुन्हा खड्डा खणण्यात आला, त्यावेळी रविदासचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रविदासच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जादूचे प्रयोग करूनच धीरज रविदासचं घर चालतं. रविदास स्वत: जादू दाखवायचा. शुक्रवारी रात्री तो मधेपूर गावात आपल्या सहकाऱ्यांसह जादूचे खेळ दाखवत होता. त्यात त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचादेखील समावेश होता. रविदासला जमिनीखाली गाडून १२ तासांनंतर त्याला जिवंत बाहेर काढण्यात येईल असा दावा करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी रविदासला खड्डा खणून गाडण्याल आलं. शनिवारी सकाळी त्याला बाहेर काढण्यासाठी पुन्हा खड्डा खणण्यात आला. मात्र रविदासचा मृत्यू झाला होता.दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

धीरज रविदासच्या मृत्यूची माहिती मिळताच वीरपूर गावावरून त्याचे नातेवाईक मधेपूरला पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बरबीघा पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच रविदासच्या वडिलांनी आणि सरपंचांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाशिवाय तिथून निघावं लागलं. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.