शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

फाइल्सचे गठ्ठे, चकरा...; यातून मिळाली मुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:25 IST

२०१० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात उद्योग सुरू करणे म्हणजे संयमाची परीक्षा होती. बांधकाम परवाना मिळविण्यात भारताचा क्रमांक १९० देशांमध्ये १८४ वा होता.

कधीकाळी परवानग्यांच्या रांगेत अडकलेला भारत २०२५ मध्ये इतिहासातील महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. व्यवसाय सुलभतेच्या पुढची पायरी गाठत, नियमांचा बोजा उतरवणारी आणि विश्वासावर उभी असलेली नवी प्रशासन संस्कृती आकार घेत आहे.

२०१० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात उद्योग सुरू करणे म्हणजे संयमाची परीक्षा होती. बांधकाम परवाना मिळविण्यात भारताचा क्रमांक १९० देशांमध्ये १८४ वा होता. एका परवानगीसाठी १८६ दिवस खर्ची पडत. या काळात ना यंत्र सुरू होत, ना रोजगार निर्माण होत... फक्त फाइल्स फिरत. हा गोंधळ अपघाती नव्हता; तो दशकानुदशके साचलेल्या नियामक अतिरेकाचा परिणाम होता. ही व्यवस्था एका रात्रीत बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या ११ वर्षांत सातत्याने, कधी अलोकप्रिय ठरलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र २०२५ हे वर्ष निर्णायक ठरले. १९९१ मध्ये उदारीकरण झाले; २०२५ मध्ये मात्र नियमनमुक्तीचा ठसा उमटला. उद्योजकीय ऊर्जेला आता केवळ संधी नाही, तर मोकळे वातावरण मिळाले आहे.

लघुउद्योगांच्या भीतीला विराम वर्षानुवर्षे अनेक उद्योग मुद्दाम लहानच ठेवले गेले. कारण विस्तार म्हणजे तपासण्या, निरीक्षक व  कायदेशीर झंझट. १०, २० किंवा १०० वा कामगार घेताच सुमारे २९ केंद्रीय कामगार कायद्यांतील अडथळे उभे राहत. ‘लघुच राहा’ हीच सुरक्षित रणनीती होती.२०२५ मध्ये ही मानसिकता मोडली. सरकारने लघु कंपन्यांची उलाढाल मर्यादा दहापटीने वाढवून १०० कोटी रुपये केली. गुंतागुंतीचे कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता लागू केल्या. 

कंपन्यांची संख्या अवघ्या ११ वर्षांत झाली दुप्पट मार्च २०१४ मध्ये सक्रिय कंपन्या ९.५२ लाख होत्या. मार्च २०२५ मध्ये ही संख्या १८.५१ लाखांवर गेली—जवळजवळ दुप्पट. कोणत्याही तात्पुरत्या सवलतीशिवाय झालेली ही वाढ व्यवस्थेतील अडथळे कमी झाल्याचा ठोस पुरावा आहे.

‘इन्स्पेक्टर राज’ नव्हे आता जनविश्वास ही ओळख  ‘जन विश्वास १.० व २.०’मुळे २०० हून अधिक किरकोळ गुन्हे गुन्हेगारी श्रेणीतून वगळले गेले. सात राज्यांनी १,००० पेक्षा जास्त तरतुदी रद्द केल्या. नियंत्रणाऐवजी विश्वास ही प्रशासनाची ओळख ठरली.

स्पष्टतेचा काळसेबीने ऑफर दस्तऐवज सुटसुटीत केले. गुंतवणूकदारांचा भर आता कागदपत्रांवर नव्हे, तर प्रत्यक्ष व्यवसायावर आहे. रिझर्व्ह बँकेने ९,००० परिपत्रके एकत्र करून २३८ मास्टर डायरेक्शन्स तयार केल्या. अनुपालन जलद आणि स्पष्ट झाले.

जागतिक बाजारपेठ खुली २०२५ मध्ये यूके, न्यूझीलंड आणि ओमानसोबत तीन मुक्त व्यापार करार झाले. न्यूझीलंडसोबतच्या करारामुळे भारताची १००% निर्यात शुल्कमुक्त झाली. जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला.

अनुपालनाचा अडसर हटलाउत्पादन क्षेत्रातील मरगळ कौशल्यामुळे नव्हती, तर प्रमाणपत्रांच्या ओझ्यामुळे होती. गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) गुंतागुंतीच्या अनुपालन जाळ्यात अडकले. ‘मेक इन इंडिया’चा आग्रह असतानाच कच्चा माल महाग आणि उशिरा मिळत होता.सरकारने यावर मोठा निर्णय घेतला. ७६ उत्पादन श्रेणींसाठी अनिवार्य अनुपालन रद्द केले, तर २०० हून अधिक श्रेणी नियमनमुक्तीसाठी निश्चित झाल्या. दशकानुदशके लागणारे बदल एका वर्षात झाले.बंदरांवरील ‘लॉगजॅम’ संपला२०१३–१४ मध्ये जहाजे बंदरांवर सरासरी चार दिवस अडकत. २०२५ पर्यंत हा वेळ एका दिवसाहून कमी झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Regulatory Burden Eases, Ushering in Era of Trust and Growth

Web Summary : India sheds regulatory burdens, fostering a culture of trust. Key reforms, including relaxed labor laws and increased turnover limits for small businesses, propel growth. Reduced port congestion and streamlined compliance boost global market access, doubling the number of active companies.
टॅग्स :businessव्यवसाय