शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Bulldozer Model: नितिन गडकरींच्या पत्नीने विचारले- उत्तर प्रदेशात काय सुरू आहे? गडकरींनी दिले अनोखे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 20:59 IST

Nitin Gadkari on Yogi Adityanath: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे.

Nitin Gadkari on Bulldozer Model: क्राइम स्टेट अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशात सध्या माफिया आणि कुख्यात गुन्हेगारांवर योगी सरकारचा बुलडोझर फिरत आहे. मुख्तार अन्सारीपासून ते अतिक अहमदपर्यंत कोणाचीही गय केली जात नाहीये. यूपीच्या बुलडोझर मॉडेलची देशभर चर्चा आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युपीबाबत एक अनोखी गोष्ट शेअर केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, माझ्या पत्नीने विचारले की, उत्तर प्रदेशात सध्या काय सुरू आहे? मी म्हणालो की, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी हत्यार उचलले होते, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील दुष्टांचा नाश करण्याचे काम करत आहेत.

बुलडोझर यूपी सरकारचे प्रमुख हत्यार 2020 मध्ये यूपीमध्ये सुरू झालेले बुलडोझरचे राजकारण आता योगी आदित्यनाथ सरकारचे प्रमुख शस्त्र बनले आहे. बुलडोझरकडे सहसा तोडफोडीचे यंत्र म्हणून पाहिले जाते, परंतु आता ते केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर राज्याबाहेरही सुशासनाचे प्रतीक बनले आहे. देशातील बहुतांश सरकारे, प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे बुलडोझरचा वापर गुन्हेगारांच्या संपत्तीवर करत आहे.

योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात जुलै 2020 मध्ये बुलडोझरची चर्चा सुरू झाली. कानपूरच्या बिक्रू गावात गुंड विकास दुबेचे घर पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर झाला. दुबे हा आठ पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता आणि त्याच्या घरावर बुलडोझर फिरवल्याने दहशतवादाने ग्रासलेल्या भागात त्वरित न्याय दिल्यासारखे वाटले. त्यानंतर मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांसारख्या माफिया डॉनच्या बेकायदेशीरपणे मालमत्ता पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. याशिवाय राज्यात अनेक प्रकरणांमध्ये थेट बुलडोझरने कारवाई झाली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश