शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात बुरा बाजार परिसरात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:30 IST

कोलकात्यातील बडा बाजार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे

कोलकाता, दि. 5 - कोलकात्यातील बुरा बाजार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. कोलकात्यातील इमारत कोसळल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या दुर्घटनेत तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसेच जखमींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कोलकाता महापालिकेचे कर्मचारी बचावकार्य राबवत आहेत. मात्र इमारत कोसळल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

गेल्या महिन्यातही मुंबईतल्या भेंडी बाजारातही एक जुनी इमारत कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर गुरुवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील 117 वर्षे जुनी सहा मजली हुसैनी इमारत सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली होती. या दुर्घटनेत 33 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 46 जणांना ढिगा-यातून सुखरुपरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये 24 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एनडीआरएफकडून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. रात्रभर हे बचावकार्य सुरू होते. सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एनडीआरएफनं दिली. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.इमारतीत तळ मजल्यावर लहान मुलांची नर्सरी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण दहा खोल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीत नऊ कुटुंब राहत असून, 60 ते 70 लोक होते. इमारत दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव शेजारच्या दोन इमारतींमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे जवान आणि अन्य यंत्रणेने जिकिरीचे प्रयत्न करीत जखमींना सुखरूप बाहेर काढले. म्हाडाने 2011मध्येच ही इमारत धोकादायक घोषित केली होती. त्यानंतर ‘सैफी बु-हाणी अपलिफमेंट ट्रस्ट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट’मध्ये होती. 2016मध्ये इमारत पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र रहिवाशांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला होता.