बांधकाम व्यावसायिकाला खडकी पोलिसांकडून अटक
By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST
पुणे : रक्कम स्विकारल्यानंतरही ग्राहकाला सदनिकांचा ताबा न देणा-या बांधकाम व्यावसायिकाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 1 कोटी 73 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.
बांधकाम व्यावसायिकाला खडकी पोलिसांकडून अटक
पुणे : रक्कम स्विकारल्यानंतरही ग्राहकाला सदनिकांचा ताबा न देणा-या बांधकाम व्यावसायिकाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 1 कोटी 73 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. देवानंद सोमय्या शेी (वय 54, रा. कल्याणीनगर) असे अटक बिल्डरचे नाव आहे. याप्रकरणी व्यापारी विजय बाबुराव शेवाळे (वय 59, औंधरोड, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेी यांची सुदेव व्हेंचर्स नावाची शिवाजीनगर येथे बांधकाम साईट होती. या साईटमधील दोन सदनिकांची शेवाळे यांनी खरेदी केली होती. त्यापोटी एकूण 1 कोटी 73 लाख रुपये शेट्टी यांना देण्यात आले होते. डिसेंबर 2010 ते जुलै 2011 पुर्वी ताबा देण्याचे आश्वासन देऊनही त्यांनी वेळेत ताबा दिला नाही. यासोबतच ताबा देण्यासाठी वेळोवेळी टाळाटाळ करून रकमेचा अपहार करून फसवणूक केली.