शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी एक महत्त्वपूर्ण निर्णय, जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढला- रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 12:22 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं. सरकारनं सत्तेत आल्यानंतर नव्या भारताचा संकल्प केला आणि देशाला या अनिश्चिततेतून बाहेर काढलं.प्रत्येक गावात गॅस कनेक्शन, सर्वशिक्षा अभियान, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारनं लक्ष्य दिलं

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला आज संसदेत भाषण केलं. यावेळी त्यांनी सरकारनं केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. माझ्या सरकारनं नव्या भारताचं स्वप्न पाहिलं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देश अनिश्चिततेच्या परिस्थितीतून जात होता. परंतु माझ्या सरकारनं सत्तेत आल्यानंतर नव्या भारताचा संकल्प केला आणि देशाला या अनिश्चिततेतून बाहेर काढलं. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचा सरकारनं पण केला आहे. मोदी सरकारनं नोटाबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं जनतेचा सरकारवरचा विश्वास वाढल्याचंही ते म्हणाले आहेत. प्रत्येक गावात गॅस कनेक्शन, सर्वशिक्षा अभियान, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारनं लक्ष्य दिलं आहे. या लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारनं  अनेक योजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांचं देशाच्या विकासात मोठं योगदान आहे. शेतकऱ्यांना मदत करणं ही सरकारची प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. माझं सरकार मच्छीमाऱ्यांना ट्रेनिंगही देत आहे. कृषी क्षेत्रातही व्यापक बदल केले जात आहेत. मुद्रा योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना मिळाल्याचंही राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं आहे.मुद्रा योजनेतून जवळपास 73 टक्के कर्जाचं महिलांना वाटप करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यानंतर महिलांना सशक्त करण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले आहेत. सरकारनं स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवलं आहे. सरकारनं 7 IIT, 7IIMची स्थापना केली असून, स्कॉलरशिप आणि फेलोशिपच्या निधीच्या मर्यादेत 25 टक्क्यांची वृद्धी करण्याचा निर्णय घेतला आहे. 103 केंद्रीय विद्यालय, 62 नवे नवोदय विद्यालय उघडण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.स्वच्छ भारतअंतर्गत 9 कोटी शौचालयांची निर्मिती केली आहे. सरकारनं 4 वर्षांत 1 कोटी 30 लाख घर तयार केली असून, देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. तसेच आतापर्यंत 21 कोटी जनतेला सुरक्षा विमा पुरविला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत 6 कोटींहून जास्त गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहेत,  रेरा कायद्यामुळे बिल्डर लॉबीला लगाम घातला, हे मुद्देही रामनाथ कोविंद यांनी अधोरेखित केले आहेत. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदBudget 2019अर्थसंकल्प 2019