शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून : ‘तलाक’ विधेयकासाठी मोदी सरकारची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:26 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.प्रस्तावित विधेयकांवर चर्चा करण्यासाठी रविवारी सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. यानंतर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, या अधिवेशनात ट्रिपल तलाकबाबतचे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्वसंमतीसाठी विविध पक्षांशी चर्चा करणार आहोत. सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर ५ मार्च रोजी अधिवेशनाच्या दुसºया टप्प्याला प्रारंभ होईल. हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालेल.विरोधक विचारणार जाब 'या अधिवेशनात ट्रिपल तलाकसंबंधी विधेयकासोबतच ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्याची सरकारची इच्छा आहे, तर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, घटनात्मक संस्थांमधील कथित वाद आणि जीएसटी व व्यावसायिकांची परिस्थिती, शेतकºयांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर विरोधक सरकारला जाब विचारूइच्छितात.काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, देशासमोरील अनेक समस्या, विषय यावर आम्ही चर्चा करू इच्छितो. सरकारने सहकार्याची भूमिका घ्यावी. देशाशी संबंधित महत्त्वाचे विषय विरोधकांना मांडू द्यावेत.सर्वपक्षीय नेते हजरकेंद्र सरकारकडून बोलविण्यात आलेली ही बैठक दुपारी ४ वाजता सुरूझाली आणि दोन तास चालली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, सपाचे मुलायम सिंह, भाकपचे नेते डी. राजा, तृृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंदोपाध्याय, द्रमुकच्या कनीमोळी आदींनी सहभाग घेतला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती.

टॅग्स :IndiaभारतBudgetअर्थसंकल्प