शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 05:26 IST

संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रा मार्गावर भोजनालयांना मालकाचे नाव लिहिण्याचे दिलेले आदेश आणि नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यांवर चर्चेची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करीत विरोधकांनी आपल्या रणनीतीचे संकेत दिले.

संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांनी सांगितले. आपचे संजय सिंह यांनी सीबीआय व ईडीच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला. डीएमकेच्या तिरुची सिवा यांनी नीटच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली.

मागील अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला पंतप्रधान मोदी उत्तर देताना विरोधकांनी व्यत्यय आणला त्याची आठवण करून देत राजनाथ सिंह आणि रिजिजू यांनी असे व्यत्यय येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सीतारामन ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर■ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत.■ सलग सातवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर नोंदवला जाईल.■ यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सहावेळा अर्थसंकल्प मांडला होता.■ सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प मांडून एक वेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवणार आहेत.

बिहार, आंध्रला विशेष दर्जा देण्याची मागणी :

जनता दल (युनायटेड) आणि वायएसआर काँग्रेसने अनुक्रमे बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. पण तेलुगू देसमने याबाबत मौन बाळगले.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024