शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; यंदा चर्चा करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी, राज्यसभेत विधेयकांवर चर्चेसाठी ७९ तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 08:03 IST

Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. राज्यसभेत या अधिवेशन काळात केंद्र सरकार मांडणार असलेली विधेयके तसेच जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी फक्त ७९ तास उपलब्ध होणार आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. राज्यसभेत या अधिवेशन काळात केंद्र सरकार मांडणार असलेली विधेयके तसेच जनहिताच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी फक्त ७९ तास उपलब्ध होणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी सुरुवात होईल. अधिवेशन काळात राज्यसभेच्या २९ बैठका होणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याची प्रत राज्यसभेत मांडण्यात येईल. या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या काळात राज्यसभेच्या १० बैठका होतील, तर १४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत उर्वरित १९ बैठका होणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत १३५ तास कामकाजासाठी मिळतील. त्यातील अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ४० तास व दुसऱ्या सत्रात ९५ तास उपलब्ध होतील. अधिवेशन काळात राज्यसभेतील कामकाजाच्या एकूण तासांपैकी दरदिवशी होणाऱ्या अर्ध्या तासाच्या शूून्य प्रहरामुळे १३ तास ३० मिनिटे खर्ची होतील. प्रश्नोत्तराच्या तासामुळे एकूण २७ तास व्यापले जातील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत सहा दिवस खासगी विधेयकांवरील चर्चेसाठी १५ तास राखून ठेवले आहेत.

राज्यसभेतील १३५ तासांपैकी प्रत्यक्षात ७९ तास ३० मिनिटे इतकाच कालावधी विविध विधेयकांच्या चर्चेसाठी मिळेल. याच तासांमध्ये लक्षवेधी सूचना, अल्पकालीन चर्चा हे कामकाज देखील होईल. 

गेल्या वर्षी राज्यसभेत ९३% कामकाजn राज्यसभेच्या २५५ व्या सत्रात ४७.९० टक्के कामकाज पूर्ण झाले होते. त्याआधी २५४व्या सत्रात हे प्रमाण २९.६० टक्के होते. n मात्र, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५३व्या सत्रातील २३ बैठकांमध्ये ९३.५० टक्के कामकाज पूर्ण झाले. n सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतही राज्यसभेप्रमाणेच कामकाजासाठी खूपच कमी तास मिळणार आहेत.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा