शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2024: अर्थसंकल्प निराशाजनक : विराेधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 07:39 IST

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या लेखानुदानावर विराेधकांनी निराशा व्यक्त केली. आपले अपयश हे यश म्हणून दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसने केली.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या लेखानुदानावर विराेधकांनी निराशा व्यक्त केली. आपले अपयश हे यश म्हणून दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका प्रमुख विराेधी पक्ष काँग्रेसने केली.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन ‘लहान’ आणि ‘निराशाजनक’ असे केले. ते म्हणाले, आपल्या अपयशाला यश म्हणून दाखविण्याचे सरकारकडे काैशल्य आहे. अर्थसंकल्पीय भाषण खूप लहान आणि निराशाजनक हाेते. अनेक मुद्द्यांना त्यात स्पर्श केलेला नाही. देशातील ४५ टक्के युवक बेराेजगार असताना तुम्ही युवा सक्षमीकरणावर बाेलू शकत नाही. 

सीतारामन यांनी थेट परकीय गुंतवणुकीबाबत (एफडीआय) उल्लेख केला. मात्र, यूपीए सरकारच्या काळातील एफडीआय ३.६ टक्क्यांवरून सध्याच्या जीडीपीच्या १ टक्क्यावर आल्याचे सांगायचे त्या विसरल्या. 

लोकप्रिय घोषणा का नाहीत?निवडणूक वर्ष असतानाही लोकप्रिय घोषणांना फाटा देत सरकार आर्थिक बाबतीत किती गंभीर आहे, हे या अर्थसंकल्पातून दिसून येते. सरकारने केलेल्या घोषणा वास्तववादी असून, त्या पूर्णपणे साध्य करता येतील, असा अंदाज अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थांवर सरकारचे लक्ष केंद्रित आहे. सरकार आर्थिक वाढीचे विविध फायदे सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे, जे सध्या काही प्रमाणात उच्च उत्पन्न गट असलेल्या शहरी कुटुंबांना मिळत आहेत. सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अर्थसंकल्पावरून दिसते, असे अर्थशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले, सरकारने फक्त स्वत:चा उदाेउदाे केला. चालू आर्थिक वर्षात १८ लाख काेटी रुपयांचा ताेटा आहे. पुढील वर्षी ताे आणखी वाढणार आहे. सरकार कर्ज घेऊन खर्च चालवत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत आहे. ‘सपा’चे नेते अखिलेश यादव यांनी सांगितले की, अर्थसंकल्प जनतेच्या विकासासाठी नसल्यास ते व्यर्थ आहे. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत काैर बादल म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प वास्तविकतेपासून खूप दूर आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024