शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2023: जुनी करप्रणाली बंद करण्याचा इशारा, अती श्रीमंतांना फायदाच फायदा; अर्थसंकल्पामधील आतली गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:28 IST

Budget 2023: नवीन कर प्रणालीवर इतर सुविधांची घोषणा करताना सरकारने आपला हेतू स्पष्ट केला आहे.

नवी दिल्ली: २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. दरम्यान, वित्तमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामधून प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांना खूशखबर दिली आहे. वित्तमंत्र्यांनी प्राप्तिकराची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. त्य़ानुसार आता ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहे. 

याबाबत घोषणा करताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा आधीच्या ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे.  वित्तमंत्र्यांनी कररचनेमध्येही फेरबदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर नवी कररचना ही पुढील प्रमाणे आहे.

नवीन कर प्रणालीवर इतर सुविधांची घोषणा करताना सरकारने आपला हेतू स्पष्ट केला आहे की, आता कर गणनाची जुनी पद्धत टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल. याचा अर्थ पुढील काही वर्षांत आयकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत उपलब्ध कर सवलतीच्या तरतुदी मागे घेतल्या जाऊ शकतात. कमाल अधिभार दर ३७ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आला आहे. या घोषणेमुळे अती श्रीमंत वर्गाला (HNIs)मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी कररचना पुढील प्रमाणे-

० ते ३ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ० टक्के कर ३ ते ६ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न ५ टक्के कर ६ ते १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न १० टक्के कर १९ ते १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न १५ टक्के कर १२ ते १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न २० टक्के कर १५ लाख रुपय़ांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Income Taxइन्कम टॅक्सEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन