शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Budget 2022: ट्रॅव्हल-टूरिझम क्षेत्राला अर्थसंक्पाकडून मोठी आशा, मिळू शकते लोन मोरेटोरियमची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 10:46 IST

Budget 2022: 2019-20 या आर्थिक वर्षात पर्यटन क्षेत्रात 3.9 कोटी लोकांना रोजगार मिळाला. पण 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेमुळे या क्षेत्राला गती मिळू शकलेली नाही.

नवी दिल्ली: कोरोनापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये देशाच्या GDP मध्ये 6.8 टक्के वाटा असलेल्या ट्रॅव्हल आणि पर्यटन क्षेत्रासाठी आगामी अर्थसंकल्पात कर्ज स्थगन (लोन मोरेटोरियम) सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर या क्षेत्रांसाठी विशेष कर्जाची घोषणा होण्याचे संकेत आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात पर्यटन क्षेत्रात 3.9 कोटी लोकांना रोजगार मिळाला. पण 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या आणि आता तिसऱ्या लाटेमुळे या उद्योगांना गती मिळू शकलेली नाही. देशाच्या सेवा क्षेत्रात टूर-ट्रॅव्हल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्यामुळे या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे.

अलीकडेच, बँकर्ससोबत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सेवा क्षेत्राची विशेष काळजी घेण्यास सांगितले होते. तसेच, आता टूर-ट्रॅव्हल्स, हॉटेल्स, या सर्वांचा इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीममध्ये समावेश करण्यात आला आहे आणि ते पूर्णपणे सरकारी हमी कर्ज घेऊ शकतात. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च रोजी संपत असून, मुदतवाढीची घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. 

कर्ज फेडण्यासाठी अतिरिक्त वेळेची मागणीकोरोनामुळे मोठे नुकसान झालेल्या या क्षेत्रांना पुन्हा उभारी मिळण्यासाठी अर्थसंकल्पात या क्षेत्रांसाठी स्वतंत्र कर्ज निधी देखील तयार केला जाऊ शकतो आणि त्यांना कमी व्याजावर पूर्णपणे सरकारी हमी कर्ज दिले जाऊ शकते. दुसरी लाट संपल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला वेग आला होता, मात्र तिसर्‍या लाटेत अनेक राज्यांतील निर्बंधांमुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योग पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळेच त्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अर्थसंकल्पात अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. 

आयकरातून सूट मिळण्याची आशाफेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएचएआरएआय) अर्थमंत्रालयाकडे सरकारची हमी दिलेले ऑपरेटिंग भांडवल उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत काही दिलासा या अर्थसंक्पात दिला जाऊ शकतो. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या सततच्या तडाख्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी भांडवलही नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या इतर संघटनांनीही देशांतर्गत प्रवासासाठी खर्च केलेल्या रकमेवर आयकरातून सूट देण्याची मागणी केली आहे जेणेकरून कोरोनाच्या कालावधीनंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळू शकेल.

व्हिसा ऑन अरायव्हल मिळण्याची शक्यतासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारचा विश्वास आहे की कोरोनाची लाट संपताच लोक पुन्हा मोठ्या संख्येने प्रवासासाठी बाहेर पडतील आणि त्यानंतर हॉटेल्स आणि पर्यटनाला झालेल्या नुकसानाचा मोठा भाग यावेळी भरुन काढता येईल. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार अधिकाधिक देशांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देऊ शकते. कन्फर्म तिकिटचे सह-संस्थापक आणि सीईओ दिनेश कुमार कोठा म्हणतात की, उद्योगाला कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुन्हा बळकट करण्यासाठी सरकार पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला अर्थसंकल्पाकडून आशा आहे.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनtourismपर्यटन