शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:36 IST

Budget 2020 : जानेवारीत जीएसटीमधून १.१० लाख कोटी रुपयांचं उत्पन्न; सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तर देशाला मंदीसदृश्य परिस्थितीतून बाहेर काढण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. मोदी सरकारसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर असताना एक सकारात्मक बातमी आली आहे. जानेवारीत सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून १.१० लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जुलै २०१७ मध्ये देशात जीएसटी लागू झाला. तेव्हापासूनचं उत्पन्न पाहता गेल्या महिन्यात (जानेवारी २०२०) सरकारला मिळालेलं उत्पन्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याआधी एप्रिल २०१९ मध्ये सरकारला जीएसटीमधून १.१३ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. विशेष म्हणजे देशात मंदीसदृश्य परिस्थिती असताना, विकासदरात सातत्यानं घसरण आणि महागाईत वाढ होताना सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न १ लाख कोटींपेक्षा अधिक राहिलं आहे. डिसेंबरमध्ये सरकारला जीएसटीमधून १ लाख ३ हजार १८४ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये जीएसटीमधून सरकारला १ लाख ३ हजार ४९२ कोटी रुपये मिळाले होते. येत्या महिन्यांमध्येदेखील जीएसटीमधून मिळणारं उत्पन्न वाढेल, अशी सरकारला आशा आहे. ही बाब लक्षात घेऊन कर विभागानं जीएसटीमधून होणाऱ्या संकलनासाठी उद्दिष्ट निश्चित केलं आहे. फेब्रुवारीत जीएसटीच्या माध्यमातून १.१५ लाख कोटी, तर मार्चमध्ये १.२५ लाख कोटींचं उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा सरकारला आहे. जीएसटी लागू झाल्यावर दर महिन्याकाठी सरकारला १ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र पहिल्या दोन वर्षांमध्ये तो अनेकदा चुकला. त्याचा परिणाम विकास दरावर आणि इतर गोष्टींवर झाला. याचीच परिणिती आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यात झाली.  

टॅग्स :budget 2020बजेटGSTजीएसटीNarendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई