शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 20:23 IST

Budget 2019 - अर्थमंत्री अरुण जेटलींवर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला.

नवी दिल्ली - आगामी एक ते दोन महिन्यांत देश निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्याआधीचा शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला. खरं तर, हे अंतरिम बजेट होतं. पण, केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून पाडला आहे. मात्र, या बजेटमधील घोषणांसाठी सरकार पैसा कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे. कारण, या घोषणेनंतर सरकारला दिवसाकाठी 1 हजार 928 कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागणार आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटलींवर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नोकरदार, शेतकरी आणि कामगार वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तर संरक्षण खात्यालाही 3 लाख कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या 2018 च्या अर्थसंकल्पाच संरक्षण क्षेत्रासाठी मोदी सरकारने सुमारे 2 लाख 95 हजार कोटींची भरीव तरतुद केली होती. ही रक्कम बजेटच्या एकूण रकमेच्या सुमारे 12.10 टक्के इतकी होती. मात्र, मोदी सरकार या सर्व घोषणांची पूर्तता कशी करणार, हा खरा प्रश्न आहे. या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी पैसा कुठून उभारणार हाच खरा प्रश्न अर्थतज्ज्ञांकडून विचारला जात आहे. मोदी सरकार आता दिवसाला 7627 कोटी रुपये खर्च करेल आणि सरकारचे उत्पन्न असेल दिवसाला 5414 कोटी. म्हणजेच सरकारला दर दिवसाला 1 हजार 928 कोटी रुपये कर्ज काढावं लागणार आहे, असे अर्थतज्ज्ञ शंकर अय्यर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले आहे. तर, लोकसत्ता वर्तमानपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. 

मोदी सरकारच्या गतवर्षीचे उत्पन्न आणि खर्च यामधील तूट मोठी आहे. गतवर्षीच्या उत्पन्न आणि खर्चातील तुटीचे अंतर 3.3 टक्के अपेक्षित होतं. मात्र, 30 नोव्हेंबर 2018 च्या आकडेवाडीनुसार सरकारने ही मर्यादा केव्हाचीच ओलांडली आहे. सरकारच्या खर्चाचा आकडा 7 लाख 16 हजार 625 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वीच्या आर्थिक तुटीनुसार हा खर्च केला असता तर 6 लाख 24 हजार 276 कोटी रुपये खर्च झाले असते. म्हणजेच, चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने 114 टक्के रक्कम अधिक खर्च केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या घोषणानंतर खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणं अतिशय कठीण असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBudget 2019अर्थसंकल्प 2019Budgetअर्थसंकल्पpiyush goyalपीयुष गोयल