शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: 5,5,5 अर्थमंत्री गोयल 'असा' खेळून गेले जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 05:44 IST

अर्थमंत्री सीए पीयूष गोयल यांनी या वेळेस समतोल साधण्याचा प्रयत्न करीत ५ या संख्येमध्ये खेळ केला आहे.

- उमेश शर्मा (सीए)

अर्थमंत्री सीए पीयूष गोयल यांनी या वेळेस समतोल साधण्याचा प्रयत्न करीत ५ या संख्येमध्ये खेळ केला आहे. ५ एकरला ६,००० रुपयांची पेन्शन, ५ लाख रुपयांना कर सवलत आणि पुढील ५ वर्षांची सत्ता असा ५,५,५ चा जॅकपॉट जुगारासारखा खेळला आहे.या अर्थसंकल्पीय खेळाची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या- रु. ५ लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर लागणार नाही. सरकारला अजून ५ वर्षे मिळावी, म्हणून मर्यादा ५ लाखांपर्यंत केली असे वाटते.पगारदार व्यक्तींना पगाराच्या उत्पन्नातून रु. ५०,००० ची वजावट मिळणार आहे. अगोदर ही मर्यादा रु.४०,००० होती.या आधी घराच्या उत्पन्नावर काल्पनिक भाडे (नोशनल रेंट) एकच घराचे करमुक्त होते, आता ते दोन घरांसाठी करमुक्त केले.भांडवली उत्पन्नातून वजावटीसाठी या आधी एका घरातच गुंतवणूक केली, तर वजावट मिळत होती, परंतु आता दुसºया घरात गुंतवणूक केली, तरीही वजावट मिळेल. भांडवली उत्पन रु.२ कोटींपेक्षा कमी असेल, तरच या योजनेचा फायदा घेता येईल. ही संधी फक्त एकदाच उपलब्ध असेल.बांधकाम क्षेत्रातील कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तयार स्टॉक विकला नसेल, तर एका वर्षानंतर त्यावर काल्पनिक उत्पन्न (नोशनल इन्कम) धरून कर भरावा लागत होता, परंतु आता ही मर्यादा दोन वर्षांपर्यंत केली आहे. यामुळे बिल्डर्स लोकांना फायदा होणार आहे.कलम ८० आयबीए अंतर्गत हाउसिंग प्रोजेक्ट वर्ष २०२० पर्यंत घेतले, तरी वजावट मिळेल. बांधकाम क्षेत्राला याचाही फायदा मिळेल.अचल संपत्तीचा भाड्यावर उद्गमी करकपात (टीडीएस) करण्याची मर्यादा रु. १,८०,००० वरून २,४०,००० पर्यंत वाढविण्यात आली आहे.बँक व पोस्ट आॅफिसमधील ठेवींच्या व्याजावरत टीडीएस कपात करण्याची मर्यादा रु. १०,००० वरून रु. ४०,००० पर्यंत वाढविण्यात आली आहे.आयकराचे रिटर्न्स लवकर प्रोसेस होतील, तसेच रिफंड २४ तासांच्या आत देण्याचा प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयल