शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Budget 2018 : इतिहासात पहिल्यांदाच सादर होणार हिंदीतून अर्थसंकल्प, अरूण जेटली ठरणार पहिले अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 11:00 IST

अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग पाचव्यांदा ते अर्थसंकल्प मांडत आहेत.  केवळ देशच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष अरुण जेटली यांच्यावर आहे. अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.  आज सकाळी 11 वाजता प्रतीक्षित असा केंद्रीय अर्थसंकल्प अरूण जेटली सादर करणार असून जेटली हे हिंदीमधून बोलतील अशी चर्चा आहे. तसे झाले तर बजेट हिंदीमधून सादर करणारे अरूण जेटली हे भारताचे पहिले अर्थमंत्री ठरणार आहेत. आत्तापर्यंत सादर झालेले सगळे केंद्रीय अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडण्यात आले होते. देशभरातील बहुसंख्य राज्यांमधील ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद व्हावा यासाठी जेटली हिंदीतून बोलणार असल्याची चर्चा आहे.

आगामी काही दिवसांमध्ये आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तसेच वर्षभरानं लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे संपूर्ण असं हे शेवटचं बजेट असेल. त्यामुळेच हे बजेट ग्रामीण भारतासाठी असेल असं बोललं जातंय. त्यामुळेच ग्रामीण भारताला ते नीट समजावं, त्यांच्या अर्थमंत्र्यांचा थेट संवाद व्हावा यासाठी अर्थसंकल्प हिंदीतून मांडण्यात येईल आणि आत्तापर्यंतचा इंग्रजीतून बजेट मांडण्याचा पायंडा जेटली मोडतील असं मानलं जात आहे. 

मंदावलेली अर्थव्यवस्था, वित्तीय तुटीचा सामना, ग्रामीण भागात असलेली नाराजी, रोजगार आणि कृषी क्षेत्राची परवड अशा अनेक समस्या देशाला घेरलेल्या असून जेटली कुणाचं किती समाधान करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हे बजेट ग्रामीण भारताला सुखावणारं असेल असा अंदाज आहे. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर व्हायला सुरूवात होणार आहे. अर्थमंत्र्यांचा लाइव्ह इंटरव्ह्यू 2 वाजता आहे, अरूण जेटली 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत तर संध्याकाळी 7 वाजता आस्क युवर एफएम हा टॉकॅथॉन कार्यक्रम होणार आहे.  

असा असणार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आजचा कार्यक्रम 

  •  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी 9 वाजता अर्थमंत्रालयात पोहोचलतील. येथे मंत्रालयातील अधिका-यांसोबत ते चर्चा करुन ते राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. 

  •  राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. येथे ते अर्थसंकल्पाच्या प्रतवर राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेतील. यानंतर ते थेट संसदेच्या दिशेनं रवाना होतील. 
  •  अरुण जेटली संसदेत पोहोचेपर्यंत अर्थसंकल्पाच्या प्रतदेखील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत संसदेत पोहोचवल्या जातील. सखोल चौकशी-तपासणीनंतर या प्रत संसदेत नेल्या जातील.
  • अरुण जेटली सकाळी 10 वाजता संसदेत पोहोचतील.  
  •  संसदेत दाखल झाल्यानंतर अर्थमंत्री कॅबिनेट बैठकीत सहभागी होतील.
  • यावेळी कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्प दाखवला जाईल व कॅबिनेटकडून त्यास मंजुरी मिळेल.  
  • कॅबिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होईल. 
  • दीड ते दोन तास अर्थसंकल्प मांडला जाईल. मात्र अर्थसंकल्प मांडण्यास लागणार कालावधी पूर्णतः अरुण जेटली यांच्या अवलंबून आहे.  
  •  दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अर्थसंकल्प पूर्णतः मांडून होईल.
  • अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन
  • 4 वाजण्याच्या सुमारास अरुण जेटली पत्रकार परिषद घेतील. 
  •  पत्रकार परिषदेत अरुण जेटली अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपा व सरकारमधील अन्य नेते अर्थसंकल्पाबाबत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील.

 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनArun Jaitleyअरूण जेटली