शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018; कोणत्या योजनेमुळे 1.3 लाख रोजगार निर्माण होण्याची सरकारला अपेक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 11:51 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने रस्ते बांधणी, बंदर विकास त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने रस्ते बांधणी, बंदर विकास त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. भारतमाला प्रकल्पाप्रमाणेच जल मार्ग विकास प्रकल्पातही अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची संधी तयार झाली आहे. या प्रकल्पातून 1.3 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी सरकारला अपेक्षा आहे. 1 फेूब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

जागतिक बँकेच्या मदतीने पूर्णत्वास जात असलेल्या या प्रकल्पासाठी 5,639 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 2014 साली केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जुलै महिन्यात मांडलेल्य़ा पहिल्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पामुळे 1500 टन वजनाची जहाजे गंगा नदीतून प्रवास करु शकणार आहेत. केंद्रीय जहाजबांधणी आणि जलवाहतूक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या प्रकल्पातून 46 हजार थेट रोजगार तयार होतील तसेच जहाज बांधणीतून 84 हजार रोजगार उपलब्ध होतील. या खात्याचा पदभार सांभाळणारे मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प मानला जातो.

जलमार्ग विकास प्रकल्प कसा असेल ?1) हा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे सध्याच्या रस्ते वाहतुकीला पर्यायी व्यवस्था निर्माण करता येईल आणि त्या वाहतुकीसाठी खर्चही कमी येईल.2) वाहतुकीचा एकूण खर्च कमी झाल्यामुळे देशातील इतर पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना गती मिळेल असे सरकारचे मत आहे. मल्टीमोडल आणि इंटर मोडल तसेच रो-रो, फेरी सुविधा अशा अनेक उद्योगांचा विकास होईल.3) या प्रकल्पातून वाराणसी, साहिबगंज, हल्दिया येथे मल्टी मोडल हब आणि कालूघाट आणि गाझीपूर  येथे इंटर मोडल टर्मिनल तर फराक्का येथे नवा जलमार्ग तयार करण्यात येणार आहे.4) त्याप्रमाणेच नौकानयनाच्या उपकरणांची निर्मिती, रो-रो सेवेची दहा टर्मिनल्स, जहाजदुरुस्तीची केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत.5) जीआयएसच्या मदतीने ऱिव्हर इन्फर्मेशन सिस्टम आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलप्रमाणे वेसल ट्राफिक मॅनेजमेंटची सोय करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८