शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018; सलग तीन वर्षे सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था- अरुण जेटली यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 12:34 IST

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत विरोधकांनी अनेकदा विशेषतः माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत.

ठळक मुद्देसंपुआ सरकार आणि रालोआ सरकार यांच्यामध्ये तुलना करताना अरुण जेटली म्हणाले, मागील वर्षाच्या काळामध्ये चालू खात्यातील तूट 4.5 टक्क्यांपुढे गेली होती तर वित्तीय तूट 6 टक्क्यांवर गेली होती. त्यामध्ये आम्ही सुधारणा करत तूट कमी केली.

मुंबई-1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली आपला अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत विरोधकांनी अनेकदा विशेषतः माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. जीएसटी लागू केल्यानंतर आणि निश्चलनीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असे मत विरोधकांनी मांडलेले आहे. इतकेच नव्हे तर एकेकाळी भाजपाप्रणित रालोआ सरकारचे अर्थसंकल्प मांडणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा तसेच दुसरे ज्येष्ठ नेते व माजी निर्गुंतवणूक मंत्री अरुण शौरी यांनीही अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती.

4 जानेवारी रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत राज्यसभेत अल्पकालावधीची चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये काँग्रेसचे सदस्य आनंद शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिले. या चर्चेमध्ये सलग 3 वर्षे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जगभरात ओळखली गेल्याचे त्यांनी या चर्चेमध्ये सांगितले होते. 

2014 साली संपुआ सरकार जेव्हा पडले तेव्हा त्या सरकारने जाताना अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत नाजूक करुन ठेवली होती असे सांगत जेटली यांनी, "तुम्ही देशाला 'फ्रॅजाईल फाइव्ह'च्या रागेत नेऊन बसवले होते." (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) असे उत्तर आनंद शर्मा यांना सांगितले. त्यानंतर आमच्या सरकारने प्रयत्न करत गेल्या तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या असेही त्यांनी या चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.संपुआ सरकार आणि रालोआ सरकार यांच्यामध्ये तुलना करताना अरुण जेटली म्हणाले, मागील वर्षाच्या काळामध्ये चालू खात्यातील तूट 4.5 टक्क्यांपुढे गेली होती तर वित्तीय तूट 6 टक्क्यांवर गेली होती. त्यामध्ये आम्ही सुधारणा करत तूट कमी केली. संपुआ सरकार असताना भारताचा क्रमांक 142वर होता तो आम्ही 100वर आणला याचा अर्थ गेल्या तीन वर्षांमध्ये नक्कीच काही चांगली पावले उचलली गेली असणार. या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने चलनवाढ 4 टकक्यांच्या आत ठेवण्यासाठी प्रयत्न केले असून जगभरातील अर्थव्यवस्था मंदावल्यावरही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. अर्थात यावरच आम्ही समाधानी नसून, आणखी वाढ करण्याची आमची इच्छा आहे. जगभरातच व्यापारामध्ये मंदी आली तर निर्यातीवर त्याचा परिणाम होणारच तरिही निर्यातीच्या आकडेवारीत स्थिरता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.

यंदाच्या बजेटचे वैशिष्ट्य-

2018-19 या वर्षासाठी सादर केले जाणारे बजेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या या रालोआ सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट असेल. 2019 साली देशामध्ये मध्यावधी निवडणुका होत आहेत. 2017 साली म्हणजे गेल्यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. 92 वर्षे हे दोन्ही अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केले. डॉ. मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा यांनी सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. 1 फेब्रुवारी 2018 साली बजेट मांडल्यावर अरुण जेटलीसुद्धा सलग पाच अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होतील.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीEconomyअर्थव्यवस्थाManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीArun Shourieअरुण शौरी