शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

Budget 2018; जन्मदिनी अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 13:59 IST

या अर्थमंत्र्यांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येत असे, त्याचप्रमाणे सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प सादर करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

ठळक मुद्देआणीबाणीनंतर काँग्रेसला देशातील जनतेने नाकारल्यावर जनता सरकारचे नेते बनण्याचा मान मोरारजी देसाई यांना मिळाला मात्र त्यांची ही कारकिर्द मोठी नव्हती.

मुंबई- स्वातंत्र्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र काही नेत्यांनी ही जबाबदारी अनेकवेळा पार पाडली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना ही संधी 10 वेळा मिळाली आहे. त्यांच्यापाठोपाठ पी. चिदम्बरम यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी 8 वेळा मिळाली आहे. मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांचा वाढदिवस केवळ लीप इयरमध्येच येत असे. मोरारजी देसाई यांनी 1960 आणि 1968 साली आपल्या वाढदिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता.

मोरारजी देसाई यांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये असणाऱ्या बलसार जिल्ह्यात (सध्या गुजरात) झाला. स्वातंत्र्यलढ्यामध्येही देसाई यांनी सहभाग घेतला होता. 1952 साली ते मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले, तत्पुर्वी त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी होती. 1958 ते 1963 आणि 1967 ते 1969 अशा काळासाठी ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. 1967 ते 69 या काळामध्ये त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाचीही जबाबदारी होती.

1962 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धासाठी झालेला खर्च भरुन काढण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. 1960 ते 63 अशा अर्थसंकल्पामध्ये करांमध्ये वाढ करुन हा खर्च भरुन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पब्लीक प्रॉव्हिडंट फंड योजनेचे ते जनक होते. देसाई यांनी एक्स्पेंडिचर करही रद्द केला.

1969 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. देसाई यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अर्थमंत्री होणारे पहिले राजकीय नेते होते. तत्पुर्वी झालेले अर्थमंत्री पेशाने सनदी अधिकारी, अर्थशास्त्राचे प्राध्यापक किंवा उद्योजक होते.

24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 या काळामध्ये मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधानही झाले. आणीबाणीनंतर काँग्रेसला देशातील जनतेने नाकारल्यावर जनता सरकारचे नेते बनण्याचा मान त्यांना मिळाला मात्र त्यांची ही कारकिर्द मोठी नव्हती. पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळ ते पूर्ण करु शकले नाहीत. त्यांच्यानंतर चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Indiaभारत