शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’ महामार्गांचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:14 IST

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. रेल्वे व रस्ते विकासावर अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वांत जास्त तरतूद झालेली आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या विकास व देखरेखीसाठी तर ८० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.२०१७-१८मध्ये देशभरात ९ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होतील, असा विश्वास वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात ३.१४ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. देशभरातील विविध भागांना जोडणाºया महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५.३५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३४ हजार ८०० किलोमीटरच्या महामार्गांची निर्मिती होणार आहे. २०१८-१९मध्ये यातील ४ हजार ५०० किलोमीटर निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. निधी उभारण्यासाठी ‘एनएचएआय’कडून महामार्गांवरील टोल, टीओटी तसेच ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेन्स्टमेंट फंड्स’चा उपयोग करण्यात येणार आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात भरीव तरतूद केल्याखेरीज देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार नाही, हे विद्यमान सरकारच्या लक्षात आले आहे. यामुळे पायाभूत क्षेत्राशी निगडित उद्योगांनाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.पर्यटनाला चालनापर्यटनाला चालना देण्यासाठी ‘रोपवे’, रेल्वे स्थानकांजवळ ‘लॉजिस्टिक पार्क’वर भर‘अमृत’ योजनेंतर्गत ५०० गावांना पाणीपुरवठा. ७७ हजार कोटींची तरतूदमोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तीय मदत मिळण्यासाठी ‘इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ची स्थापना.‘डिझास्टर रेसिलिएन्ट इन्फ्रास्ट्रक्चर’च्या विकासासाठी ६० कोटींची तरतूद‘डिजिटल इंडिया’मोहिमेसाठी३ हजार ७३ कोटींची तरतूदमहामार्ग, बंदरांसाठी निधीभारतमाला २९,६६३.१३ कोटीविजयवाडा-रांची कॉरिडॉर २,९४० कोटीईशान्येकडील राज्य ६,२१० कोटीअरुणाचल पॅकेज ५,७१० कोटीकुठल्याही योजनेत नसणाºया महामार्गांचा विकास १८,५०६.४२ कोटीबंदरांच्या आधुनिकीकरणासाठी 600कोटी अर्थसंकल्पात जहाज मंत्रालयासाठी एकूण 1658 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी 600कोटींची तरतूद समाविष्ट आहे. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पIndiaभारत